तृप्ती डिमरीचं नशीब फळफळलं, दीपिका पादुकोणला आउट करत संदीप वांगा रेड्डीने दिली संधी, साऊथमध्ये डेब्यू करणार
Tripi Dimri : तृप्ती डिमरीचं नशीब फळफळलं, दीपिका पादुकोणला आउट करत संदीप वांगा रेड्डीने दिली संधी, साऊथमध्ये डेब्यू करणार

Tripi Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरीचं (Tripi Dimri) जणू नशीब फळफळलंय. कारण टॉलिवूडचा दिग्गज अभिनेता प्रभास याच्या आगामी मेगा बजेट चित्रपट असलेल्या स्पिरिटमध्ये तिला महत्त्वाचा रोल मिळालाय. अभिनेत्री दीपिका पदुकोण चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी अभिनेत्री तृप्ती डिमरीला (Tripi Dimri) कास्ट केले आहे. तृप्तीने स्वतः तिच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्यामुळे तृप्तीला (Tripi Dimri) दीपिका जागी काम करण्याची आणि स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
‘स्पिरिट’ हा प्रभासचा आगामी अॅक्शन-ड्रामा चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंग’ यांसारखे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा करत आहे. हा चित्रपट टी-सिरीज बॅनरखाली भूषण कुमार यांच्याकडून निर्मित होत आहे. अभिनेता प्रभास ‘साहो’, ‘राधे श्याम’ आणि ‘आदिपुरुष’सारख्या सिनेमांनंतर आता ‘स्पिरिट’साठी सज्ज झाला असून हा सिनेमा त्याच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
या सिनेमात प्रभास एक कठोर आणि सखोल वृत्ती असलेला पोलीस अधिकारी साकारत आहे, जो भ्रष्टाचार आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीविरुद्ध लढतो. या भूमिकेत तो एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. ‘स्पिरिट’मध्ये सामाजिक न्याय, कायद्याचा प्रभाव, आणि व्यक्तिगत संघर्ष यांचा सुरेख मिलाफ दाखवण्यात येणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या सिनेमात तृप्ती डिमरी मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार असून याआधी दीपिका पदुकोण यांचे नाव चर्चेत होते, पण नंतर तृप्तीची निवड करण्यात आली. सिनेमाचे चित्रीकरण वेगवेगळ्या देशांमध्ये होणार असून त्यात अॅक्शन, ड्रामा आणि थराराचा जबरदस्त संगम पाहायला मिळेल.
‘स्पिरिट’ हा सिनेमा हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये आणि काही आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे, कारण त्याचा विषय व्यापक असून प्रभासचा ग्लोबल फॅनबेस देखील मोठा आहे. हा सिनेमा 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. प्रभासच्या चाहत्यांसाठी ‘स्पिरिट’ एक मोठा आकर्षण ठरणार असून त्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























