Low Budget Hit Films : बॉलिवूड म्हटलं की, नायक नायिकेचा रोमान्स, बर्फाच्छादित लोकेशन्स आणि सुमधुर गाणी असं चित्र पटकन डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, आजकाल प्रेक्षकांची पसंती बदलली आहे. आता प्रेक्षक या ‘लव्ह रोमान्स’ चित्रपटांऐवजी, वास्तविक जीवनातील कथा आणि माहितीपट पाहण्यास प्राधान्य देत आहेत. नुकताच असाच एक चित्रपट आला आहे, ज्याने अवघ्या 14 कोटींच्या बजेटमध्ये 200 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट आहे ‘द कश्मीर फाइल्स’!
आजकाल प्रेक्षकही चांगल्या कथेच्या शोधात आहेत. जर, चित्रपटाची कथा चांगली असेल, तर प्रेक्षक प्रमोशन न करताही चित्रपट पाहण्यासाठी थिएटरकडे धाव घेतात. मात्र, जर कथानक चांगले नसेल तर तुम्ही कितीही प्रमोशन केले, तरी त्या चित्रपटाची जादू काही दिसणार नाही. आज आपण त्या चित्रपटांबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे बजेट कमी होते, पण त्यांची कमाई छप्परफाड होती. या कथा प्रेक्षकांना इतक्या आवडल्या की, त्यांनी कमी बजेटचे चित्रपटही बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरवले.
द कश्मीर फाइल्स
विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची कथा मोठ्या पडद्यावर आणली, तेव्हा प्रेक्षकही या चित्रपटाकडे आकर्षित झाले. अवघ्या 14 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पाही पार केला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करतो. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कहानी
‘कहानी’ हा चित्रपट 2012मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसली होती. 8 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल 105 कोटींची कमाई केली होती.
पान सिंग तोमर
तिग्मांशु धुलियाच्या ‘पान सिंग तोमर’ या पुरस्कार विजेत्या चित्रपटात दिवंगत अभिनेता इरफान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. 8 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की, या चित्रपटाने 20 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला.
नो वन किल्ड जेसिका
राणी मुखर्जी अभिनीत ‘नो वन किल्ड जेसिका’ची ही कहाणी इतकी दमदार होती की, 9 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता. या चित्रपटाची कथा पाहिल्यानंतर या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
हेही वाचा :
- RRR : आरआरआरच्या प्रमोशनसाठी आलियाचा खास लूक; साडीची किंमत माहितीये का?
- Dasvi Trailer: दसवीचा ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha