RRR : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) 'आरआरआर' (RRR) हा चित्रपट आज (25 मार्च) प्रदर्शित होणार आहे. तिच्या गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता आरआरआर देखील प्रेक्षकांचे मनं जिंकेल का? याचं उत्तर लवकरच मिळेल. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया ही पांढऱ्या रंगाचा आऊट घालत होती. पण आरआरआर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलियानं खास लूक केला आहे.
सब्यसाची मुखर्जी डिझाइन केलेली ऑरेंज साडी, हिरवी बिंदी आणि लाइट मेक-अप असा लूक आलियानं केला होता. रिपोर्टनुसार, फ्लोवर प्रिंटेड ऑरेंज आणि ब्लॅक रंगाच्या या साडीची किंमत 69 ते 72 हजारांच्यामध्ये आहे.
आरआरआर या चित्रपटामध्ये आलिया भट्टसोबतच अजय देवगन , ज्युनियर एनटीआर आणि राम चरण हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. एसएस राजामौली यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या बिग बजेट चित्रपटामधील शोले हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. रिपोर्टनुसार, आरआरआर हा चित्रपट तयार करण्यासाठी 400 कोटी रूपये खर्च करण्यात आले. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी राम चरण आणि ज्युनियर एनटीआरनं 45 कोटी रूपये मानधन घेतलं आहे तर आलियनं नऊ कोटी मानधन घेतलं. अजय देवगणनं या चित्रपटात कमी वेळासाठी स्क्रिन शेअर करणार आहे. त्यानं या चित्रपटासाठी 25 कोटी फी घेतली आहे.
संबंधित बातम्या
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Dasvi Trailer: दसवीचा ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha