Dasvi Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) दसवी (Dasvi) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहिल्यानंतर अभिषेकचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. अभिषेकचे  वडील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी दसवी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर ट्वीट शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे. 


अमिताभ यांनी दसवी चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक पोस्टमध्ये शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'भैय्यू तुला खूप शुभेच्छा.  इतर चित्रपटांपेक्षा या चित्रपटामध्ये तुझी भूमिका वेगळी आहे. तुझे मूव्स मला खूप आवडले. '






अजय देवगणनं देखील ट्वीट शेअर करून अभिषेकला शुभेच्छा दिल्या आहेत. अजयनं ट्वीटमध्ये लिहिले, 'जबरदस्त ट्रेलर आहे. मी चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहात आहे. अभिषेख तुला शुभेच्छा.'






दसवी हा चित्रपट 7 एप्रिल 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहेत. हा चित्रपट जियो सिनेमा आणि नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. अभिषेक बच्चनसोबतच यामी गौतम आणि निम्रत कौर या अभिनेत्रींनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha