The Archies : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान (Suhana Khan), अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर (Khushi Kapoor) आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agstya Nanda) बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. लोकप्रिय कॉमिक सिरीजवर आधारित असलेल्या झोया अख्तरच्या दिग्दर्शनातील आगामी 'द आर्चीज' (The Archies) या चित्रपटातून हे तिघे बॉलिवूड पदार्पण करणार आहेत. सुहाना, खुशी आणि अगस्त्याला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्या रीमा कागती यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.


पाहा पोस्ट :



रीमाने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर क्लॅपबोर्डचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ‘द आर्चीज’च्या पहिल्या शॉटची माहिती दिली आहे. हा चित्रपट रीमा कागती आणि झोया अख्तर एकत्रितपणे तयार करणार आहेत. फरहान अख्तरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर हीच पोस्ट पुन्हा शेअर केली आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. दरम्यान, चित्रपटात अगस्त्य ‘आर्चीज अँड्र्यूज’च्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे, तर खुशी आणि सुहाना, बेट्टी आणि वेरोनिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


झोयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या प्रोजेक्टची घोषणा केली होती. मात्र, या चित्रपटातील कलाकारांबाबत तिने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंग उटी आणि जवळच्या हिल स्टेशन्समध्ये केले जाणार आहे.


श्रीदेवीचीही इच्छा पूर्ण होणार!


धाकट्या मुलीने, खुशी कपूरने इंडस्ट्रीत पाऊल टाकावे, अशी श्रीदेवीची नेहमीच इच्छा होती. त्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे, पण आपल्या मुलीला पडद्यावर पाहण्यासाठी त्या या जगात नाही. खुशी कपूर गेल्या काही महिन्यांपासून जिम आणि डान्स क्लासच्या बाहेर स्पॉट होत होती. ती तिच्या याच चित्रपटाची तयारी करत होती. त्याचवेळी तिच्यासोबत अगस्त्य नंदाही दिसला होता. अगस्त्य हा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा यांचा मुलगा आहे. त्याला देखील त्याचे आजोबा आणि मामा यांच्याप्रमाणे चित्रपटात काम करायचे आहे.


हेही वाचा :