Vedaant Madhavan : ‘3 इडियट्स’ चित्रपटानंतर अभिनेता माधवनला (R Madhavan) लोकांचे खूप प्रेम मिळाले. या चित्रपटानंतर तो इंडस्ट्रीचा फेव्हरेट बनला. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ अभिनेताच नाही, तर त्याच्या मुलाचीही सध्या खूप चर्चा होते आणि तीही अभिनयामुळे नाही तर त्याच्या खेळामुळे... माधवनचा मुलगा वेदांत माधवन (Vedaant Madhavan) अतिशय उत्तम जलतरणपटू म्हणून उदयास येत आहे. कोपनहेगन येथे झालेल्या डेन्मार्क ओपनमध्ये पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत त्याने रौप्य पदक पटकावले आहे. वेदांतने 10 जलतरणपटूंच्या अंतिम फेरीत 15.57.86 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले.


माधवनने आपल्या इंस्टाग्रामवर आनंद व्यक्त करत ही बातमी शेअर केली आहे, ‘आपल्या मुलाने पोहण्यात मिळवलेल्या यशाचा अत्यंत अभिमान वाटतो’, असे तो म्हणाला. मुलाला रौप्य पदक मिळाल्याची व्हिडीओ क्लिप पोस्ट करत अभिनेत्याने लिहिले की, ‘वेदांत माधवनने कोपनहेगनमधील डॅनिश ओपनमध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकले. प्रदीप सर, स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि #ansadxb तुमच्या सर्व प्रयत्नांबद्दल तुमचे खूप खूप आभार. आम्हाला खूप अभिमान वाटत आहे.’


पाहा पोस्ट :



वेदांतने जलतरण स्पर्धेत पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, 16 वर्षीय जलतरणपटूने बेंगळुरू येथे झालेल्या 47व्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये चार रौप्य पदके आणि तीन कांस्यपदके जिंकली होती. याआधी गेल्या वर्षी मार्चमध्ये, वेदांतने लॅटव्हियन ओपन स्विमिंग चॅम्पियन्स स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते आणि त्याच्या कामगिरीमुळेच लोकांनी माधवनच्या मुलाची तुलना अनेक स्टार किड्सशी करायला सुरुवात केली आणि म्हटले की, बॉलिवूडच्या स्टारकिड्स मधला हा फरक आहे.


अव्वल भारतीय जलतरणपटू साजन प्रकाशने डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे झालेल्या डॅनिश ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 200 मीटर बटरफ्लाय सुवर्णपदक जिंकून हंगामाची सुरुवात केली. या वर्षीच्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत असलेल्या प्रकाशने 1.59.27 सेकंदांची वेळ नोंदवली. तत्पूर्वी, केरळचा जलतरणपटू हीटमध्ये 2.03.67 सेकंद वेळेसह 'अ' अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता.


हेही वाचा :