Gayathri Accident : लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री गायत्री (Gayathri) उर्फ डॉली डी क्रुझ (Dolly D Cruze) हिचे कार अपघातात निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तिच्या मित्रासोबत कारने घरी येत होती आणि हैदराबादच्या गचीबोवली भागात तिचा अपघात झाला. गायत्री फक्त 26 वर्षांची होती. गायत्रीच्या मृत्यूमुळे संपूर्ण साऊथ इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. तिचे चाहतेही खूप दुःखी आहेत. गायत्रीने लहान वयातच हे जग सोडले. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, गायत्री शुक्रवारी रात्री होळी साजरी करून तिच्या घरातून परतत होती.
यावेळी तिचा मित्र गाडी चालवत होता. मात्र, त्यानंतर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळली. गायत्रीसोबत त्याच्या मित्राचेही निधन झाले आहे. गायत्रीला जागीच मृत घोषित करण्यात आले, तर तिच्या मित्राला रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरही त्याला वाचवू शकले नाहीत. याच अपघातात आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
गायत्रीला तिच्या ‘लसा रायडू’ या यूट्यूब चॅनलवरून लोकप्रियता मिळाली आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय होती आणि सोशल मीडियावरही तिचे चांगले फॅन फॉलोइंग होते. चाहत्यांना तिचे फोटो आणि व्हिडीओ खूप आवडायचे. याशिवाय गायत्रीने अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये काम केले आहे.
गायत्रीच्या मृत्यूची बातमी तिच्या शोमध्ये आईची भूमिका करणारी तिची मैत्रिण आणि सह-अभिनेत्री सुरेखा वाणी यांनी शेअर केली होती. त्यांनी लिहिलं की, तू आम्हाला इतक्या लवकर सोडून कसं काय जाऊ शकतेस? आपण एकत्र खूप छान वेळ घालवला आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाही. तुझ्यासोबत खूप काही शेअर करायचे होते, पार्टी करायची होती. तू आम्हाला खूप लवकर सोडून गेलीस. मी तुला नेहमी मिस करेन’, अशी पोस्ट तिने लिहिली होती.
हेही वाचा :
- The Kashmir Files Box Office Collection Day 10: ‘द कश्मीर फाइल्स’ने मोडले अनेक रेकॉर्ड, 10व्या दिवसाची कमाई पाहिलीत?
- Sonam Kapoor Pregnancy: कुणी तरी येणार गं.... सोनम कपूर-आनंद आहुजाने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!
- Happy Birthday Rani Mukerji : जन्माच्या वेळी दुसऱ्या बाळासोबत झाली होती राणीची अदला बदल! तुम्हाला माहितीये का ‘हा’ किस्सा?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha