The Kashmir Files: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाची क्रेझ दुसऱ्या आठवड्यातही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. या चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहेत. इतकंच नाही, तर सध्या देश-विदेशात फक्त 'द कश्मीर फाइल्स'चीच चर्चा आहे.


बॉक्स ऑफिसवर सलग दुसरा आठवडा टिकून राहणे ही कोणत्याही चित्रपटासाठी मोठी गोष्ट असते. मात्र, नवीन रेकॉर्ड मोडत चित्रपट सतत कमाई करत असताना ही गोष्ट अधिक खास बनते. आता 'द कश्मीर फाइल्स'चे 10व्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे, ज्याने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे.


'द कश्मीर फाइल्स'ने मोडले अनेक रेकॉर्ड!


पहिल्या दिवशी 3.25 कोटींची ओपनिंग करणाऱ्या या चित्रपटाने, सुरुवातीपासूनच अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता ‘द कश्मीर फाइल्स’ने रिलीजच्या 10व्या दिवशी 26.20 कोटींचा गल्ला जमवला आहे. अवघ्या 14 कोटी रुपये खर्चून बनलेला हा चित्रपट लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. 'बाहुबली 2' नंतर 'द कश्मीर फाइल्स' हा एकमेव चित्रपट आहे, ज्याने रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात 73 कोटींची कमाई केली आहे आणि हा एक विक्रम आहे.


 





'द कश्मीर फाइल्स'चे आतापर्यंतचे कलेक्शन


दिवस 1 - 3.55 कोटी


दिवस 2 - 8.50 कोटी


दिवस 3 - 15.10 कोटी


दिवस 4 - 15.05 कोटी


दिवस 5 - 18 कोटी


दिवस 6 - 19.05 कोटी


दिवस 7 - 18.05 कोटी


दिवस 8 - 19.15 कोटी


दिवस 9 - 24.80 कोटी


दिवस 10 - 27 कोटी


एकूण - 167.45 कोटी


अवघ्या 14 कोटीत बनलेल्या या चित्रपटात 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये अनुपम खेर (Anupam Kher), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakrborty) आणि दर्शन कुमारसारखे (Darshan Kumaar) स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाचे यश पाहून तो आता तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही डब केला जात आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha