Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार? VIDEO
गेल्या अनेक दिवसांपासून आपण सर्वजण नेटफ्लिक्सवरच्या ज्या धमाकेदार सीरिजची आतुरतेनं वाट पाहत होतो, ती आता लवकरच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. अखेर 'स्क्विड गेम सीजन 2' (Squid Game 2 Trailer) रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहणार असाल, तर जरा जपूनच पाहा... यातला थ्रील, सस्पेन्स पाहून तुमच्या पायाखालची जमीन नक्की हादरेल. या सीझनमध्येही आवाढव्य रक्कम जिंकण्यासाठी गेममध्ये सहभागी झालेले प्लेयर्स आपल्या जिवाची बाजी लावताना दिसणार आहेत. पण, या सीझनचा सर्वात मोठा ट्वीस्ट आहे तो म्हणजे, मागच्या सीझनमधला प्लेयर 456 ची या सीझनमधली एन्ट्री. या प्लेयरनं पहिल्या सीझनमध्ये गेम जिंकला होता आणि 45.6 बिलियनची रक्कम आपल्या नावे केली होती. गेममध्ये तो एकटाच शेवटपर्यंत जिवंत राहिला होता. पण आता हा प्लेयर नव्या उद्देशानं पुन्हा खेळात उतरणार आहे. आता त्याला फक्त लोकांचे प्राण वाचवायचे नाहीत तर या जीवघेण्या गेमच्या मास्टरमाईंडला संपवायचं आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Tharla Tar Mag : ठरलं तर मग! सायली-अर्जुनच्या नात्यात प्रेमाचं 'कॉन्ट्रॅक्ट,' मनातल्या भावना आता तरी ओठांवर येणार?
स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ठरलं तर मग (Tharla Tar Mag) मालिकेत सध्या प्रेमाचं वळण आल्याचं पाहायला मिळतंय. कारण सायली आणि अर्जुन यांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झालीये. त्यामुळे आता दोघांनाही त्यांच्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करायच्या आहेत. त्यातच सध्या त्यांच्यात सुरु असलेल्या प्रेमाचा खेळाचा गोड अनुभवही प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. इतकच नव्हे तर सायलीच्या बाबतीमध्ये अर्जुन दिवसागणिक अधिकच भावनिक होत चालला असल्याचंही चित्र आहे. त्यातच आता सायली आणि अर्जुन लवकरच त्यांच्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करणार आहेत.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Priya Bapat : प्रिया बापटचा आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव, Indian Oceanच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केला परफॉर्मन्स; म्हणाली...
मालिका, रंगभूमी आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमधून अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. तसेच तिच्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनंही जिंकली आहेत. तिच्या प्रत्येक भूमिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता प्रिया ओटीटी माध्यमांवरही वरचढ ठरत असल्याचं चित्र आहे. असं सगळं असतानाच प्रिया तिच्या सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. इतकच नव्हे तर तिच्या आयुष्यातल्या अनेक छोट्या गोष्टी या तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. असाच एक तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव प्रियाने नुकताच शेअर केला आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Naga Chaitanya आणि Sobhita Dhulipala च्या लग्नाचं अॅग्रीमेंट तयार, किती कोटींची डिल कन्फर्म?
लगीनसराई (Naga Chaitanya Sobhita Dhulipala Marriage) जोरात सुरू आहे. अशातच सेलिब्रिटी कसे मागे राहतील, यंदाच्या वेडिंग सीझनमध्ये फिल्म इंडस्ट्रीमधील धडाकेबाज सुपरस्टार नागार्जुनचा (Nagarjuna) मोठा मुलगा नागा चैतन्य दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार आहे. मॉडल आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत (Sobhita Dhulipala) नागा चैतन्य (Naga Chaitanya) लग्नगाठ बांधणार आहे. यापूर्वी नागा चैतन्य आणि लेडी सुपरस्टार समंथा प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांचा विवाह झाला होता. पण काही कारणास्तव दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Shubhavi Gupte : अशोक सराफांच्या मालिकेतून मराठी स्टारकीडचं इंडस्ट्रीत पदार्पण; अभिनेत्री लेकीसाठी झाली भावूक, म्हणाली...
बॉलिवूड प्रमाणेच मराठीतही अनेक सेलिब्रेटींची मुलं त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहेत. विराजस कुलकर्णी, शुभंकर तावडे, सखी गोखले यांसह अनेक कलाकारांनी आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाची वाट धरली. आता आणखी एक स्टारकीड या वाटेवर आहे. अभिनेता लोकेश गुप्ते (Lokesh Gupte) आणि अभिनेत्री चैत्राली गुप्ते (Chaitrali Gupte) यांची लेक शुभवी गुप्ते (Shubhavi Gupte) हीने नुकतच तिचं इंडस्ट्रीतलं पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे तिला तिचं पहिलंच काम हे अशोक सराफ यांच्यासोबत करण्याची संधी मिळाली आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Housefull 5: अक्षय कुमारच्या ‘हाउसफुल 5’ बाबत मोठी अपडेट, यावेळी 'या' बड्या अभिनेत्रींचा समावेश
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, ‘हाउसफुल 5’ या आगामी सिनेमाच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. यावेळी हाऊसफुलच्या फ्रेंचायझीत फक्त कॉमेडीच नाही तर बड्या अभिनेत्रींचाही तडका पाहायला मिळणार आहे.