Squid Game 2 Trailer OUT: गेल्या अनेक दिवसांपासून आपण सर्वजण नेटफ्लिक्सवरच्या ज्या धमाकेदार सीरिजची आतुरतेनं वाट पाहत होतो, ती आता लवकरच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. अखेर 'स्क्विड गेम सीजन 2' (Squid Game 2 Trailer) रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहणार असाल, तर जरा जपूनच पाहा... यातला थ्रील, सस्पेन्स पाहून तुमच्या पायाखालची जमीन नक्की हादरेल. या सीझनमध्येही आवाढव्य रक्कम जिंकण्यासाठी गेममध्ये सहभागी झालेले प्लेयर्स आपल्या जिवाची बाजी लावताना दिसणार आहेत. पण, या सीझनचा सर्वात मोठा ट्वीस्ट आहे तो म्हणजे, मागच्या सीझनमधला प्लेयर 456 ची या सीझनमधली एन्ट्री. या प्लेयरनं पहिल्या सीझनमध्ये गेम जिंकला होता आणि 45.6 बिलियनची रक्कम आपल्या नावे केली होती. गेममध्ये तो एकटाच शेवटपर्यंत जिवंत राहिला होता. पण आता हा प्लेयर नव्या उद्देशानं पुन्हा खेळात उतरणार आहे. आता त्याला फक्त लोकांचे प्राण वाचवायचे नाहीत तर या जीवघेण्या गेमच्या मास्टरमाईंडला संपवायचं आहे.


स्क्विड गेम सीझन 2 चा ट्रेलर काही स्पर्धकांना गेम खेळण्यासाठीच्या निमंत्रणानं सुरू होतो. बॅकग्राउंडला व्हॉईस ओव्हर, त्यात सांगितलंय की, तुम्ही लोकांना गोळ्या घाला किंवा त्यांची फसवणूक करा, काहीही बदलणार नाही. मग येतो सर्वात मोठा ट्विस्ट, खेळाडू क्रमांक 456 फ्रेममध्ये येतो, ज्याला विचारलं जातं की, त्याला काय हवंय. तो 'स्क्विड गेम'च्या बॉसना सांगतो की, त्याला पुन्हा गेममध्ये यायचंय.


प्लेयर 456 चा तो मास्टरप्लान; मास्टरमाईंडचा खात्मा करणार? 


पण खेळाडू क्रमांक 456 गेममध्ये प्रवेश करताच, जीवघेणा खेळ पुन्हा सुरू होतो. जो हरतो, त्याला गोळ्या घालून संपवलं जातं. दरम्यान, खेळाडू 456 आपला मास्टर प्लान आखतो. ज्यांनी हा खेळ तयार केला, त्यांचा खात्मा करण्याचं तो ठरवून टाकतो. त्यानंतर तो सर्वच्या सर्व 455 खेळाडूंना आपल्या प्लानमध्ये घेण्याचा तो प्रयत्न करतो.


पाहा Squid Game Season 2 चा ट्रेलर :



प्लेयर 456 करणार गेमचा 'The End'


प्लेयर 456 सर्वांना आपल्या बाजूनं घेतो आणि तो सर्वांना गाईडसुद्धा करतो. पण, सर्व प्लेयर्सवर पैशांची भूरळ पडली आहे. सर्वांनाच कोणत्याही परिस्थितीत ही रक्कम जिंकायची असते. मग, जिव गेला तरी चालेल... Squid Game Season 2 मध्ये प्लेयर 456 ची भूमिका अभिनेता Lee Jung Jae नं साकारली आहे. ली व्यतिरिक्त 'स्क्विड गेम 2' मध्ये डिटेक्टिव ह्वांग जून-हो च्या भूमिकेत Wi Ha-jun ची वापसी झाली आहे. याव्यतिरिक्त Lee Byung-hun फ्रंट मॅनच्या भूमिकेत वापसी करत आहे. 


26 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर पाहा 'स्क्विड गेम सीजन 2'


जगभरात गाजलेली ही सीरिज ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर 26 डिसेंबरपासून स्ट्रीम केली जाणार आहे. 'स्क्विड गेम'चा पहिला सीझन 2021 मध्ये आला होता. हा त्यावेळी नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला गेलेला शो होता. ही सीरिज तब्बल 2.2 बिलियन तास पाहिली गेली होती. म्हणजेच, या शोला 265 मिलियन व्यूज मिळाले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे वहिनीचे टोमणे; अभिषेकसोबतच्या नात्यासोबतच आता भावजयीसोबतच्या नात्यामुळे ऐश्वर्या चर्चेत