Priya Bapat : मालिका, रंगभूमी आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमधून अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. तसेच तिच्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनंही जिंकली आहेत. तिच्या प्रत्येक भूमिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता प्रिया ओटीटी माध्यमांवरही वरचढ ठरत असल्याचं चित्र आहे. असं सगळं असतानाच प्रिया तिच्या सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. इतकच नव्हे तर तिच्या आयुष्यातल्या अनेक छोट्या गोष्टी या तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. असाच एक तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव प्रियाने नुकताच शेअर केला आहे.


इंडियन ओशन या बँडचे जगभरात चाहते आहेत. नुकताच या बँडचा मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टला अभिनेत्री प्रिया बापट हिने देखील हजेरी लावली होती. पण विशेष म्हणजे याच कॉन्सर्टमध्ये प्रियाने तिचा परफॉर्मन्स सादर केला. हाच अनुभव नुकताच प्रियाने शेअर केला आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर या कॉन्सर्टमधला एक व्हिडीओ तिने पोस्ट केलाय. तसेच यावर दिलेल्या कॅप्शननेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


प्रियाच्या कॅप्शनने वेधलं लक्ष


आयुष्यात कायमच लक्षात राहिल अशी एक जादुई संध्याकाळ... इंडियन ओशनच्या कॉन्सर्टमध्ये मी लाईव्ह परफॉर्मन्स करेन अशी कधी कल्पनाही केली नव्हती. मी स्वत: माझ्या कॉलेजच्या दिवसापासून या बँडची चाहती आहे. त्यांचं संगीतही मी अगदी मनापासून जगले देखील आहे. पण आज याच बँडने माझं खूप छान स्वागतही केलं. त्यांच्याच ग्रीनरुमध्ये मला जाता आलं, बॅकस्टेजला भेटता आलं आणि त्यांच्यासोबत संगीतही जगता आलं. मी त्यांच्यासोबत माझं संगीतावरचं प्रेम शेअर केलंय, हे सगळं स्वप्नच वाटतंय. 


पुढे प्रिया म्हणाली की, मला त्यांच्यासोबत स्टेजवर उभं राहता आलं, हा क्षण मी कधीच विसरणार नाही. त्यावर चाहत्यांनी मनभरुन डान्स करणं, त्यांनी चिअर करणं आणि आमच्यासोबत त्यांनी गाणं हे सगळं माझ्यासाठी जादुई होतं. हे सगळं बघताना खूप छान वाटलं. 35 वर्ष त्यांचं म्युझिक अनेकांच्या काळजाला भिडलं. ती रात्र खरोखर लक्षात राहण्यासारखी होती. थँक यू."






ही बातमी वाचा : 


जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,