Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Bigg Boss Marathi 5 : लयभारी! 'बिग बॉस मराठी'बाबत मोठी अपडेट समोर; महेश मांजरेकर नव्हे तर रितेश देशमुख करणार होस्टिंग
Bigg Boss Marathi 5 Latest Update : 'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. चौथा सीझन संपल्यापासून चाहते पाचव्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. आता 'बिग बॉस मराठी 5' संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'बिग बॉस मराठी' सुरू झाल्यापासून महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या कार्यक्रमाचं होस्टिंग करत आहेत. पण आता पाचव्या पर्वाचा मात्र ते भाग नसतील. बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Pune Accident : 'आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून तुरुंगात टाकायचा कायदा आणा', पुण्यातील पोर्शे अपघातावर मराठी अभिनेत्याची पोस्ट
Marathi actor post on Pune Porshe Accident : रविवारची पहाट ही पुणेकरांसाठी (Pun Porshe Car Accident) हादरवून सोडणारी ठरली. पुण्यातील कल्याणीनगर भागात एक अपघात घडला आणि दोन तरुण इंजिनीअर्सचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला. पोर्शे कारमुळे झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. दरम्यान या घटनेनंतर सामान्य जनेतूनमध्ये याबद्दल तीव्र रोष देखील व्यक्त केला जातोय. याचं मुख्य कारण म्हणजे ही भरधाव वेगात ही कार चालवणारा एक धनिकपुत्र असून त्याचं नाव वेदांत अग्रवाल असं आहे. वेदांत हा मध्यरात्री पिऊन वेगाने गाडी चालवत होता. दरम्यान वेदांत हा अल्पवयीन असून त्याला अपघातानंतर अवघ्या काही तासांतच जामीन मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
India Most Expensive Web Series : देशातील सर्वात महागडी वेबसीरिज कोणती? बजेटसमोर 'हीरामंडी' कुठेच नाही
ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रत्येक आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. हे चित्रपट आणि वेबसीरिज ओटीटीच्या जोरावर कोट्यवधींची कमाई करतात. त्यामुळे या वेबसीरिजसाठी निर्मातेदेखील कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. पण भारत देशातील सर्वात महागडी वेबसीरिज कोणती? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? जाणून घ्या देशातील सर्वात महागड्या वेबसीरिजबद्दल...
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Cannes Panchayat Fame Ashok Pathak : फक्त टाळ्या, टाळ्या अन् टाळ्याच; पंचायत फेम 'बिनोद'च्या चित्रपटानं कान्स फेस्टिवल गाजवलं, मराठी अभिनेत्रीचीही आहे खास भूमिका
Cannes Panchayat Fame Ashok Pathak : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत'मध्ये (Panchayat Web Series) बिनोदची भूमिका साकारणाऱ्या अशोक पाठकवर (Ashok Pathak) कान्स महोत्सवात (Cannes) कौतुकाचा वर्षाव झाला. कान्स चित्रपट महोत्सवात डायरेक्टर्स फोर्टनाईटनुसार अशोकची प्रमुख भूमिका असलेला 'सिस्टर मिडनाईट' (Sister Midnight) चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहत जवळपास 10 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला. या चित्रपटात राधिका आपटे ही देखील प्रमुख भूमिकेत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..
OTT Release This Week : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ते करीनाचा 'क्रू'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
OTT Release This Week : ओटीटीची (OTT) क्रेझ चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही लोक सिनेमागृहात बसून सिनेमाची मजा घेऊ शकत नाहीत. त्यांनी घरी बसून रोमांचक शो आणि चित्रपट पाहायला आवडतात. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रत्येक आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांची (Movies) आणि वेबसीरिजची (Web Series) चाहत्यांना उत्सुकता असते. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात कोरिअन, इंग्लिश, हिंदी, साऊथसह विविध भाषेतील वेगवेगळा कंटेट रिलीज करण्यात येतो. या आठवड्यातही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar) ते करीना कपूरच्या (Kareena Kapoor) 'क्रू'पर्यंत अनेक कलाकृती या आठवड्यात रिलीज होणार आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...