Bollywood Actress : बॉलिवूडनगरीत (Bollywood) अनेक कलाकारांच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच होत असतात. पण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांची लव्हस्टोरी आजही चर्चेत असते. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याशी जोडलेले अनेक किस्से आजही ऐकायला मिळतात. रेखामुळे कधी जया बच्चनच्या डोळ्यात पाणी आलं आहे. तर कधी अमिताभ-जया या पत्नी-पत्नीसोबत रेखाचं लॉन्ग ड्राइव्हला जाणं असो. अभिनेता महमूदच्या बायोग्राफीमध्ये हा किस्सा सांगण्यात आला आहे. 


रेखा-अमिताभ बच्चन-जया बच्चन या लव्ह ट्रँगलची सिनेसृष्टीत चांगलीच चर्चा झाली. अमिताभ आणि रेखा 70 च्या दशकातील लोकप्रिय जोडी होती. ऑनस्क्रीनसह ऑफस्क्रीनदेखील त्यांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. रेखा आणि जया सुरुवातीला एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी होत्या. पण अमिताभसोबतच्या नात्यामुळे जयाने रेखाला दूर केलं. दोघे एकाच बिल्डिंगमध्ये राहायचे. त्यावेळी जया स्टार झाली होती. तर रेखाच्या करिअरचे सुरुवातीचे दिवस सुरू होते.


हनीफ जावेरीने महमूदच्या 'महमूद: अ मॅन ऑफ मॅन मूड्स' या बायोग्राफीमध्ये त्यांच्या लव्ह ट्रँगलवर भाष्य केलं आहे. त्यात लिहिलं आहे,"महमूदचा भाऊ अनवर, अमिताभ बच्चनचा जवळचा मित्र आहे". महमूदने आपल्या बायोग्राफीमध्ये लिहिलं आहे,"अनवरने मला सांगितलं की तो अमिताभ आणि जयाला लॉन्ग डाईव्हला घेऊन जात असे. कारच्या पुढच्या सीटवर अमिताभ आणि जया बच्चन बसत असे. तर मागच्या सीटवर रेखा बसायची". 


रेखाच्या बायोग्राफीमध्ये काय लिहिलेलं? 


रेखाच्या बायोग्राफीमध्ये एक पूर्ण चॅप्टर जयाला समर्पित करण्यात आला आहे. या चॅप्टरचं नाव 'दीदीभाई' असं आहे. रेखाने यात लिहिलं आहे,"काही यशस्वी चित्रपटांच्या यशानंतर रेखाने 1972 मध्ये मुंबईत स्वत:चं घर घेतलं. अजंटा हॉटेल सोडल्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी रेखा जुहू बीच अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली. जया भादुरीदेखील याच अपार्टमेंटमध्ये राहायची. जया त्यावेळी एक यशस्वी अभिनेत्री झाली होती. एकाच अपार्टमेंटमध्ये राहत असल्याने त्यावेळी जया आणि रेखा एकमेकींना सतत भेटत असे. त्यावेळीच अमिताभ बच्चन आणि रेखा यांची पहिली भेट झाली. त्याकाळी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जयाकडे जास्त पॉवर होती. 


अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा हे तिघेही यश चोप्राच्या 'सिलसिला' (1981) या चित्रपटात एकत्र झळकले. अमिताभ आणि रेखा यांचा हा एकत्र असा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर दोघांनी कधीही स्क्रीन शेअर केली नाही. हा रोमँटिक, नाट्यमय चित्रपट होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला. पण या चित्रपटात या कलाकारांची खरी गोष्ट दाखवण्यात आली असल्याचं म्हटलं जातं. 


संबंधित बातम्या


Lok Sabha Elections 2024 : अमिताभ बच्चन यांनी राजकारण का सोडलं? स्वत:च सांगितलं कारण