OTT Release This Week : ओटीटीची (OTT) क्रेझ चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही लोक सिनेमागृहात बसून सिनेमाची मजा घेऊ शकत नाहीत. त्यांनी घरी बसून रोमांचक शो आणि चित्रपट पाहायला आवडतात. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रत्येक आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांची (Movies) आणि वेबसीरिजची (Web Series) चाहत्यांना उत्सुकता असते. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात कोरिअन, इंग्लिश, हिंदी, साऊथसह विविध भाषेतील वेगवेगळा कंटेट रिलीज करण्यात येतो. या आठवड्यातही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar) ते करीना कपूरच्या (Kareena Kapoor) 'क्रू'पर्यंत अनेक कलाकृती या आठवड्यात रिलीज होणार आहेत. ओटीटीवरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात हॉलिवूड ते साऊथ इंडियन दिग्दर्शनकांपर्यंत अनेकांचे शो आणि चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत. जाणून घ्या या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट आणि वेबसीरिजबद्दल...


स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) 
कधी रिलीज होणार? 28 मे 2024
कुठे रिलीज होणार? झी 5


'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीपने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 20 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अंकिता लोखंडेदेखील होती. 28 मे 2024 रोजी हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


क्रू (Crew) 
कधी रिलीज होणार? 24 मे 2024
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


'क्रू' हा विनोदी चित्रपट आहे. राजेश ए कृष्णनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि कृती सेननने हवाईसुंदरीची भूमिका साकारली आहे. तसेच दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एकता कपूर, रिया कपूर, अनिल कपूर आणि दिग्विजय पुरोहितच्या बालाजी मोशन पिक्चर्स आणि अनिल कपूर फिल्मस अॅन्ड कम्युनिकेशन नेटवर्क या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 24 मे 2024 रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.


वाँटेड मॅन (Wanted Man) 
कधी रिलीज होणार? 24 मे 2024
कुठे पाहता येईल? लॉयन्सगेट प्ले


'वाँटेड मॅन'चं कथानक एका गुप्तहेराभोवती फिरणारं आहे. 24 मे 2024 रोजी लॉयन्सगेट प्लेवर प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतात. 


द कार्दशियन (The Kardashians)
कधी रिलीज होणार? 23 मे 2024
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार


'द कार्दशियन' हा चित्रपट दोन बहिणी किम, कॉर्टनी आणि ख्लोए, त्याचे चुलत बहिण-भाऊ केंडल आणि काइली जेनर आणि त्याची आई क्रिस जेनर यांच्या वैयक्तिक आयुष्याभोवती फिरणारी आहे. 'द कार्दशियन सीझन 5' 23 मे 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


संबंधित बातम्या


Singham Again : अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'मध्ये 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री! नाव ऐकून बसेल धक्का