Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Tharla Tar Mag : सायली-अर्जुनच्या प्रेमाचा बेरंग करण्याचा प्रयत्न, सुभेदारांची सून प्रियाला तिची जागा दाखवत उधळणार डाव
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेत सध्या होळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रताप सुभेदारांची निर्दोष सुटका झाल्यानंतर सुभेदारांच्या घरी उत्साहाचं वातावरण आहे. त्याचप्रमाणे महिपतचा खरा चेहरा सायली आणि अर्जुनने समोर आणला, त्यामुळे सायलीवरही सगळे खूश आहेत. त्याच प्रमाणे मालिकेत सायली आणि अर्जुनचं प्रेम सध्या खुलत चाललं असल्याचं पाहायला मिळतंय. पण त्यांच्या या प्रेमाचा प्रिया बेरंग करण्याचा करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी सायली प्रियाचा हा डाव उधळून लावत तिला तिची जागा दाखवून देते.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sai Lokur : 'पण लोकांना माझं जाड शरीरच दिसतं', गरोदरपणानंतर ट्रोल करणाऱ्यांना सई लोकूरने सुनावलं
बिग बॉस सिजन 1 (Bigg Boss Season 1) मुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) हिने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिने तिच्या सोशल मीडियावरुन ही गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत सईचं अभिनंदन देखील केलं. पण त्यावेळी सईला तिच्या शरीरावरुन अनेकांनी ट्रोल देखील केलं. तिच्या जाड शरीरावरुन अनेक कमेंट्स सईच्या व्हिडिओवर केल्या जातात. पण आता या सर्वांना सईने त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Athiya Shetty Pregnant : सुनील शेट्टी लवकरच आजोबा होणार? अथियाच्या प्रेग्नंसीबाबत स्वत:च दिली मोठी अपडेट, 'पुढच्या वेळेस...'
सुनील शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि तिचा क्रिकेटर पती केएल राहुल (KL Rahul) लग्नानंतर खूप एन्जॉय करत आहेत. चार वर्षांच्या डेटिंगनंतर केएल राहुलने 23 जानेवारी 2023 अथिया शेट्टीशी लग्न केले.दोघांच्या लग्नाला आता एक वर्ष झालं असून त्यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत थेट अथियाचे वडिल आणि अभिनेते सुनील शेट्टीने एक मोठी अपडेट दिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
BJP : भाजपचा 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील पात्रांच्या माध्यमातून प्रचार; 'हे अजिबात चुकीचं नाही', निर्माते आसितकुमार मोदींचं स्पष्ट मत
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या पक्षाकडून प्रचाराचा नारळ फोडला जातोय. त्याचप्रमाणे अनेक माध्यमातून प्रत्येक पक्षाकडून त्यांचा त्यांचा प्रचार करण्यात येतोय. नुकतच भाजपकडून (BJP) जारी करण्यात आलेल्या एका पोस्टरमध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या कार्यक्रमातील पात्रांचा वापर करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर या पोस्टरची जोरदार चर्चा सुरु आहे. पण यावर काहींनी आक्षेप घेत एका कार्यक्रमातून पक्षाचा प्रचार कसा होऊ शकतो असा सवाल उपस्थित केला आहे. यावर निर्मात्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
राहुल गांधी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहायला येणार असतील तर मी अख्खं थिएटर बुक करेन: देवेंद्र फडणवीस
बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा चित्रपट 22 मार्च रोजी प्रदर्शित झाला. सुरुवातीपासूनच या चित्रपटाला धरुन अनेक गोष्टी बोलल्या जात होता. रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) या चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारली असून त्यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. सध्या या सिनेमा राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय ठरतोय. याच सिनेमावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला.