Athiya Shetty Pregnant : सुनील शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि तिचा क्रिकेटर पती केएल राहुल (KL Rahul) लग्नानंतर खूप एन्जॉय करत आहेत. चार वर्षांच्या डेटिंगनंतर केएल राहुलने 23 जानेवारी 2023 अथिया शेट्टीशी लग्न केले.दोघांच्या लग्नाला आता एक वर्ष झालं असून त्यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं म्हटलं जात आहे.  याबाबत थेट अथियाचे वडिल आणि अभिनेते सुनील शेट्टीने एक मोठी अपडेट दिली आहे. 


सुनील शेट्टी यांच्या या वक्तव्यामुळे अथियाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे लवकरच शेट्टींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण या सगळ्याची येत्या काळात चाहत्यांना उत्तरं मिळतीलच. त्याचप्रमाणे या सर्व प्रश्नांवर सुनील शेट्टींनी केलेल्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 






सुनील शेट्टीने दिली मोठी अपडेट


सुनील शेट्टी माधुरी दीक्षितसोबत 'डान्स दिवाने' या डान्स रिॲलिटी शोचा जज आहे. अलीकडेच, भारती सिंगने होस्ट केलेल्या शोमध्ये आजोबांचा एक विशेष भाग होता. एपिसोड दरम्यान, भारती सुनीलला सांगते की तो आजोबा झाल्यावर त्याला कसे वागावे लागेल, कारण कोणतंही मूल इतक्या सुंदर आजी - आजोबांना नाही सांभाळू शकत.  ज्यावर सुनील म्हणाला- होय, पुढच्या सीझनमध्ये येईन तेव्हा आजोबासारखं स्टेजवर फिरेन.


अथिया शेट्टी प्रेग्नंट?


दरम्यान सुनील शेट्टीच्या विधानाकडे सर्वांचे लक्ष वेधलं. त्यामुळे अथिया शेट्टी खरच प्रेग्नंट आहे का, असा प्रश्न सध्या लोकांना पडून लागला आहे.  हे नाकारता येत नाही की केएल राहुल आणि अथिया या दोघांना खूपच खासगी आयुष्य जगायला आवडतं. त्यामुळे अथिया जरी प्रेग्नंट असेल तरी त्यांना ही बातमी अजूनही प्रायव्हेटच ठेवायला आवडेल. याशिवाय अथिया मागील काही काळापासून कोणत्याही चित्रपटामध्ये झळकली नाही. त्याचप्रमाणे ती क्वचितच कोणत्यातरी कार्यक्रमात दिसते. त्यामुळे अथिया प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.  


ही बातमी वाचा : 


Spruha Joshi Serial Update : 'चला हवा येऊ द्या'मधील 'ही' अभिनेत्री झळकणार स्पृहा जोशीच्या मालिकेत, छोट्या लेकाचीही होणार दमदार एन्ट्री