Devendra Fadanvis on Rahul Gandhi : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा चित्रपट 22 मार्च रोजी प्रदर्शित झाला. सुरुवातीपासूनच या चित्रपटाला धरुन अनेक गोष्टी बोलल्या जात होता. रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) या चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारली असून त्यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. सध्या या सिनेमा राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय ठरतोय. याच सिनेमावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिला. मुंबईच्या अंधेरीतील फन रिपब्लिक सिनेमागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचं विशेष स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. त्या देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली. यावेळी सिनेमात सावरकरांची भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुडा उपस्थित होता. सिनेमा पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना सावरकर सिनेमावरुन टोलाही मारला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट मराठीत देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता सुबोध भावे याने सावरकरांना आवाज दिलाय. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला आनंद आहे की तो आज मराठीत ही प्रदर्शित होतोय. या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद आहे. 


राहुल गांधींवर साधला निशाणा


यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर मी संपूर्ण  थिएटर बूक करेन आणि त्यांना हा सिनेमा पाहायला घेऊन जाईन. तरुण पिढीने हा सिनेमा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे त्यांनी म्हटलं की,  मी रणदीपचं कौतुक करतो की त्याने खरा इतिहास लोकांपर्यंत आणला आहे. असे सिनेमे येणे खूप महत्त्वाचं आहे. भारताचा खरा इतिहास पाहायचा असेल तर हा सिनेमा पाहावाच लागेल. कारण काही इतिहासकारांनी, विशेषत: काँग्रेसने सर्वात जास्त कोणत्या स्वातंत्र्यसेनानीवर वार केला असेल तर तो सावरकर साहेबांनावर केला गेलाय, असं मला वाटतंय. 


सावरकरांना शब्दांत मांडणं अशक्य - देवेंद्र फडणवीस


मी सावरकरांचं सगळं वाचलं आहे, त्यांना काही शब्दांत मांडणं हे अशक्य आहे. त्यांचे विचार हे शिकण्यासारखे आहेत. विज्ञान किती महत्त्वाचं आहे आणि आपण कसे गुलाम झालो हे ही त्यांनी लिहिलंय, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. 



ही बातमी वाचा : 


Sunny Deol : भाजपचं धक्कातंत्र, गुरुदासपूरमधून सनी देओलला घरी बसवलं, फरीदकोटहून हंसराज हंस यांना उतरवलं, पाहा आठवी यादी