Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Subodh Bhave :  छोट्या पडद्यावर व्यक्तीरेखेसाठी पहिल्यांदाच होणार AI चा वापर; सुबोध भावेचे मालिका विश्वात कमबॅक



Subodh Bhave :  सध्या सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (Artificial Intelligence) चर्चा सुरू आहे. या AI च्या वापराबाबत अनेक मतमतांतरे समोर येत असतात. अनेकजण त्याच्या सकारात्मक पैलूबाबतही बोलताना दिसतात. आता, छोट्या पडद्यावर मालिकेतील व्यक्तीरेखेसाठी AI चा वापर करण्यात येणार आहे. मालिकेतील एखाद्या व्यक्तीरेखेसाठी पहिल्यांदाच AI चा  वापर करण्यात येणार आहे. सोनी मराठीवरील आगामी 'तू भेटशी नव्याने’ या मालिकेत एआयचा वापर होणार आहे. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.  सोनी मराठी वाहिनीवर नुकतंच 'तू भेटशी नव्याने’ या मालिकेचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 


 


Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, फक्त सलमानच नव्हे तर आणखी दोन कलाकार होते रडारवर!



Salman Khan House Firing Case Update : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पाचव्या आरोपीला राजस्थानमधून अटक केली होती. या पाचव्या आरोपीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधून मोहम्मद चौधरी याला अटक केली होती. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 



Marathi Serial Updates Star Pravah : 'ती परत येतेय...'चं गुपित उलगडलं; 'या' अभिनेत्रीचे तब्बल 9 वर्षानंतर स्टार प्रवाहवर कमबॅक


Marathi Serial Updates Star Pravah :    छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. टीआरपीच्या शर्यतीच आघाडीवर राहण्यासाठी सगळ्याच वाहिन्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने प्रेक्षकांमध्ये नव्या मालिकांबद्दल उत्सुकता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. मागील काही दिवसांपासून 'स्टार प्रवाह'कडून (Star Pravah) 'ती परत येतेय...' या टॅगखाली नव्या मालिकेबद्दल आणि अभिनेत्रीबद्दल उत्सुकता वाढवण्यात आली होती. अखेर आज त्यावरून पडदा उघडण्यात आला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर तब्बल 9 वर्षानंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) कमबॅक करणार आहे. स्टार प्रवाहची नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत तिची मुख्य भूमिका असणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Karmaveer Bhaurao Patil : जीवनातला तिमिर जावा,प्रबोधनाची पहाट व्हावी..."कर्मवीरायण" चित्रपटाचा ट्रेलर लाँच



Karmaveer Bhaurao Patil Biopic Karmveeranyan :  महाराष्ट्रातील खेडापाड्यातर, बहुजन-वंचित समाजामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांचा  जीवनपट आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'कर्मवीरायण' या चित्रपटातून कर्मवीर अण्णांचा जीवनपट साकारला जाणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. कर्मवीरांचा जीवनपट मांडणाऱ्या  "कर्मवीरायण" या चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सव गाजवल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


OTT Movies : थरार, नाट्य अन् रहस्यमय चित्रपट पाहायला आवडतात? ओटीटीवरचे हे सिनेमे नक्कीच पाहा; हॉलिवूडलाही देतात टक्कर



OTT Movies : आजच्या घडीला चित्रपटगृहात जाऊन सिनेमा (Movies) पाहण्यापेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहायला प्रेक्षकांना आवडतं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रोमान्स, मिस्ट्री, अॅक्शन आणि थरार, नाट्य असणारे अनेक चित्रपट आणि सीरिज आहेत. ओटीटीवर फक्त बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूडपासून दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील अनेक चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. दाक्षिणात्य चित्रपट पाहायला तुम्हाला आवडत असतील तर ओटीटीवर हॉलिवूडला टक्कर देणारे हे चित्रपट नक्की पाहा. नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हे चित्रपट पाहता येतील. थरार, नाट्य, रहस्य असणारे हे चित्रपट पाहताना तुमच्याही अंगावर शहारे येतील. जाणून घ्या या दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल... (Must Watch South Movies)


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Gulabi Sadi : 'गुलाबी साडी' गाण्यानंतर आता संजू भारतभर करणार मराठी गाण्यांचे कॉन्सर्ट, बॉलीवूडमध्येही काम करण्याची व्यक्त केली इच्छा



Gulabi Sadi :  सध्या अगदी सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटी लोकांना वेड लावणारं 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) हे गाणं जगभर गाजतंय. आजपर्यंत लाखो रिल्स या गाण्यावर करण्यात आलेत. हे गाणं लिहिणारा संजू राठोड (Sanju Rathod) हा चांगलाच प्रकाशझोतात आला. संजूची आतापर्यंतही गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत होती, पण त्याच्या या गाण्याने त्याला विशेष प्रसिद्धी दिली. इतकच नव्हे तर फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातही त्याला हे गाणं सादर करण्याची संधी मिळाली. पण या गुलाबी साडीने कसं आयुष्य बदललं याविषयी संजूने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..


 


Salman Khan Rashmika Mandanna : नॅशनल क्रश रश्मिकासोबत भाईजानचा रिल लाईफ रोमान्स; पुढच्या ईदला दबंग खानची चाहत्यांना खास ईदी



Salman Khan Rashmika Mandanna :  यंदाच्या रमझान ईदला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट प्रदर्शित झाला नाही. पण,  त्याने आपल्या चाहत्यांना निराश न करता 'सिंकदर' या चित्रपटाची घोषणा केली. भाईजानने दिलेल्या या ईदीवर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. 'सिंकदर' हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. सलमानसोबत कोणती अभिनेत्री झळकणार याची चर्चा सुरू होती. आता रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सलमान सोबत ऑनस्क्रिन रोमान्स करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास करणार आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..