OTT Movies : आजच्या घडीला चित्रपटगृहात जाऊन सिनेमा (Movies) पाहण्यापेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहायला प्रेक्षकांना आवडतं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रोमान्स, मिस्ट्री, अॅक्शन आणि थरार, नाट्य असणारे अनेक चित्रपट आणि सीरिज आहेत. ओटीटीवर फक्त बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूडपासून दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील अनेक चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. दाक्षिणात्य चित्रपट पाहायला तुम्हाला आवडत असतील तर ओटीटीवर हॉलिवूडला टक्कर देणारे हे चित्रपट नक्की पाहा. नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हे चित्रपट पाहता येतील. थरार, नाट्य, रहस्य असणारे हे चित्रपट पाहताना तुमच्याही अंगावर शहारे येतील. जाणून घ्या या दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल... (Must Watch South Movies)


सराभम (Sarabham) : सराभम हा चित्रपट 2014 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात मर्डर, रहस्य असे अनेक सीन दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना MX Player या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.


कुट्रम 23 (Kuttram 23) : अरुण विजय (Arun Vijay) आणि महिमा नांबियार (Mahima Nambiar) यांचा कुट्रम 23 हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. एक महिला हरवते तेव्हा काय होतं हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार आणि झी 5 वर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.


रतसासन (Ratsasan) : रतसासन हा क्राइम, थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.


थीरन अधिगामन ओन्द्रू : थीरन अधिगामन ओन्द्रू हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतात. 


कॅथी (Kaithi) : कॅथी हा तामिळ भाषेतील थ्रिलर चित्रपट आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.


वाडाचेन्नई : वाडाचेन्नई या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष मुख्य भूमिकेत आहे. एका खेळाडूची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.


यू टर्न : यू टर्न चित्रपट प्रेक्षक झी 5 वर पाहू शकतात. या चित्रपटात सस्पेंस आणि थ्रिल आहे. 


वाइफ ऑफ राम : वाइफ ऑफ राम हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एक महिला केंद्रस्थानी आहे. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल. 


संबंधित बातम्या


Bollywood Actress : आलिशान आयुष्य जगतोय दाक्षिणात्य सुपरस्टार, हिंदी चित्रपटांतही दाखवली जादू; 'पुष्पा'फेम अभिनेत्रीला करतोय डेट!