Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..
Vinesh Phogat Disqualified :भारताच्या 'गोल्ड'न आनंदावर विरजण, विनेशसाठी मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला,'ही एक प्रामाणिक चूक...'
पॅरिस ऑलम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मधून विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अपात्र ठरवल्यानंतर भारतीयांमध्ये निराशी पसरली. अंतिम सामना अवघ्या काही तासांवर असताना काही ग्रॅम वजनासाठी तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे या निर्णयाचा भारताकडूनही तीव्र विरोध केला जातोय. त्यातच विनेशसाठी अनेकांनी पोस्ट करत पाठिंबा दिला आहे. अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) याने देखील पोस्ट केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस'च्या घरात योगिताचा मास्टरस्ट्रोक, 'कोकणहार्टेड गर्ल' ठरली यंदाच्या सीझनची पहिली कॅप्टन
'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) यंदाच्या सीझनमधील घराला पहिला कॅप्टन मिळाला आहे. 'कोकणहार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर ही बिग बॉसच्या घराची कॅप्टन झाली आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये शेवटच्या टप्प्यात योगिताने आपला कौल अंकिताच्या बाजूने दिला. 'कॅप्टन्सी टास्क'च्या दरम्यान घरातील सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाल्याचे दिसून आले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Vinesh Phogat : तुझी माफी मागण्याची लायकी नाही, तुला दंडवत, भाजपमध्ये गेलेल्या मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत!
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesha Phogat) हिने पॅरिस ऑलम्पिकच्या (Paris Olympics 2024) अंतिम फेरीत धडक देत भारतीयांच्या सुवर्णाआशा उंचावल्या आहेत. भारताच्या या लेकीच्या कामगिरीची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत दखल घेतली जातेय. विनेशने क्युबाच्या गुझमान लोपेझ हिला पराभूत करत विजय आपलासा केला. त्यामुळे तिच्यावर सध्या कौतुकांचा वर्षाव होत आहे. काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेला अभिनेता अभिजीत केळकर याने देखील विनेशसाठी पोस्ट लिहिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Kangana Ranaut On Vinesh Phogat : ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटची अंतिम फेरीत धडक, कंगना म्हणते, मोदींना विरोध करूनही....
महिला कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये () इतिहास रचत अंतिम फेरीत धडक मारली आहे. विनेशने महिलांच्या 50 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन हिला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह विनेश अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या दरम्यान भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतची (Kangana Ranaut) पोस्ट चर्चेत आली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Bigg Boss Marathi : 'लायकी, भीक अन् घाणेरडी भाषा...,' बायको स्पर्धक तरीही मराठी अभिनेत्याची बिग बॉसवर खरमरीत पोस्ट
राडे, भांडणं, घरात राहण्यासाठी संघर्ष हे सगळं मागच्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावर पाहायला मिळतंय. बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) सुरुवातीपासून प्रेक्षकांना बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतायत. घरातील भांडणांवरही प्रेक्षकांचीही नाराजी पाहायला मिळाली. त्यातच आता एका मराठी अभिनेत्याने या कार्यक्रमावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Bigg Boss Marathi : छोटा पुढारीचा मोठा गेम, बिग बॉसच्या घरात कॅप्टनचाच आदेश धुडकावला; आता पुढे काय होणार?
'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घराला अखेर पहिला कॅप्टन मिळाला आहे. 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू-वालावलकरला पहिली कॅप्टन होण्याचा बहुमान मिळाला आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू झाल्यापासून घरात निक्कीचीच चर्चा आणि हवा होती. पण आता अंकिता कॅप्टन झाल्याने यापुढे गेम चेंज झालेला पाहायला मिळेल.