Shravan Travel : हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिना हा व्रत-वैकल्याचा, उपासनेचा महिना समजला जातो. या महिन्यात कुटुंबासोबत धार्मिक सहलीला गेल्याने कुटुंबातील सदस्यांना एक शांततेची अनुभूती मिळते, सोबत मानसिक आरोग्यही चांगले राहते. या काळात कुटुंबियांनी आपल्या मुलांना धार्मिक सहलीवर घेऊन जावे. कारण यामुळे मुलांचे मन आणि मेंदू शांत राहतो. यामुळे त्यांना संस्कृती, पौराणिक कथा आणि इतिहासाचे ज्ञान मिळते. त्यांची देवावरील श्रद्धा कायम राहते, तसेच ते दररोज त्याची पूजा करू लागतात. जर तुम्हालाही श्रावण महिन्यात विविध तीर्थक्षेत्रांना भेट द्यायचीय, भारतीय रेल्वे तुम्हाला सुवर्णसंधी देत आहे. जाणून घ्या सविस्तर..




 


रामेश्वरम टूर पॅकेज


हे 1 दिवसाचे टूर पॅकेज आहे.
12 ऑगस्टपासून मदुराई येथून सुरुवात होत आहे.
पॅकेजमध्ये, तुम्हाला कॅबने प्रवास करायला लावला जाईल.
पॅकेज फी- दोन लोकांसोबत प्रवास केल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 6200 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 4150 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 1550 रुपये आहे.
हे लक्षात ठेवा की पॅकेजमध्ये खाद्यपदार्थ आणि हॉटेल सुविधा उपलब्ध होणार नाहीत, कारण पॅकेज फक्त एका दिवसासाठी आहे.




जम्मू/कटरा टूर पॅकेज



हे 3 रात्री 4 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
त्याची सुरुवात 11 ऑगस्टपासून दिल्लीतून होत आहे.
पॅकेजमध्ये, तुम्हाला कॅबने प्रवास करायला लावला जाईल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 7855 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 6795 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 6160 रुपये आहे.
पॅकेजमध्ये जेवण आणि हॉटेलची सुविधा उपलब्ध असेल.
तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करू शकता.





चेन्नई/कन्याकुमारी/मदुराई टूर पॅकेज


हे 6 रात्री 7 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
त्याची सुरुवात 28 ऑगस्टपासून दिल्लीतून होत आहे.
पॅकेजमध्ये, तुम्हाला कॅबने प्रवास करायला लावला जाईल.
पॅकेज फी - दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 54,640 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 52,700 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 41,880 रुपये आहे.
पॅकेजमध्ये जेवण आणि हॉटेलच्या सुविधा उपलब्ध असतील.


 


 


हेही वाचा>>>


Shravan Travel : श्रावणात भगवान शंकराच्या दर्शनाचं सौभाग्य..अन् भारतीय रेल्वेची सुवर्णसंधी! IRCTC चे टूर पॅकेजेस एकदा पाहाच..


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )