Kangana Ranaut On Vinesh Phogat :  महिला कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat)  पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये () इतिहास रचत अंतिम फेरीत धडक मारली आहे. विनेशने महिलांच्या 50 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत  क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन हिला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह विनेश अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या दरम्यान भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतची (Kangana Ranaut) पोस्ट चर्चेत आली आहे. 


कंगणाची पोस्ट चर्चेत, मोदींना विरोध करूनही...


भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियावर विनेशच्या यशाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, 'भारताला पहिले सुवर्ण मिळावे यासाठी मी प्रार्थना करत आहे. विनेश फोगट एकदा आंदोलनात सहभागी झाली होती, ज्यात तिने 'मोदी तुमची कबर खोदणार' असे म्हटले होते. असे असतानाही त्याला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तिला उत्तम प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि सुविधा मिळाल्या. हेच लोकशाहीचे सौंदर्य आणि सर्वोत्कृष्ट नेत्याचे चिन्ह असल्याचे कंगनाने म्हटले. 




विनेश फोगाट आणि इतर काही कुस्तीपटूंनी  भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत आंदोलन केले होते. कुस्तीपटूंचे हे आंदोलन राजकीय हेतूने आणि काही खेळाडूंना निवड प्रक्रिया, इतर बाबींमध्ये विशेष सवलत मिळावी यासाठी होते असाही दावा केला जात होता. त्यानंतर आता विनेशने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारत आपले पदक निश्चित केले आहे.


विनेश सुवर्ण पदक पटकावणार?


बृजभूषण सिंह  यांच्याविरोधातील आंदोलनामुळे विनेश जवळपास वर्षभर कुस्तीच्या आखाड्यापासून दूर होती. विनेशने आता ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारत एकच खळबळ उडवून दिली आहे. 


विनेशने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत युक्रेनच्या ओसाना लिवाचचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. तिने आठव्या मानांकित कुस्तीपटूचा 7-5 असा पराभव केला. याआधी उपउपांत्यपूर्व फेरीत तिने जपानच्या अव्वल मानांकित युई सुसाकीचा 3-2 असा पराभव करून मोठा उलटफेर केला होता. विनेश फोगटने अंतिम फेरीतही अशीच दमदार कामगिरी केली तर ती भारताला या ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्ण मिळवून देईल. 


इतर महत्त्वाची बातमी :