Vinesh Phogat Disqualified : पॅरिस ऑलम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मधून विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अपात्र ठरवल्यानंतर भारतीयांमध्ये निराशी पसरली. अंतिम सामना अवघ्या काही तासांवर असताना काही ग्रॅम वजनासाठी तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे या निर्णयाचा भारताकडूनही तीव्र विरोध केला जातोय. त्यातच विनेशसाठी अनेकांनी पोस्ट करत पाठिंबा दिला आहे. अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) याने देखील पोस्ट केली आहे. 


विनेशने जेव्हा अंतिम सामन्यात धडक मारली तेव्हा तिच्यासाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जल्लोष करण्यात आला. पण आता देशाच्या कानाकोपऱ्यापासून विनेशला पाठिंबा देण्यात येतोय. त्यामुळे भारतीयांच्या सुवर्णस्वप्नाचा जरी चुराडा झाला असला तरीही विनेशच्या कामगिरीवर मात्र प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. 


आस्तादची पोस्ट काय?


मला खात्री आहे की, यामध्ये कुणाचाही निष्काळजीपणा, खेळाडूचीही आणि सपोर्ट स्टाफचीही नाही. ही एक प्रामाणिक चूक होती. निश्चित असलेलं एक पदक भारताने गमावलं आहे. विनेश ही स्पर्धा हरतेय. पण तिने क्रीडा जगतामध्ये आणि तिच्या संपूर्ण देशात मिळालेला आदर कधीही गमावणार नाही, अशी पोस्ट आस्तादने विनेशसाठी केली आहे. दरम्यान विनेशने अंतिम सामन्यात धडक दिल्यानंतरही आस्तादने तिच्यासाठी पोस्ट केली होती.


त्यावेळी त्याने म्हटलं होतं की, 'कुस्तीची लढत संपताक्षणी झालेला विनेश फोगात यांचा चेहरा बघण्यासारखा होता, तरी बघवत नव्हता. मला खूप काही भासलं त्या चेह-यवर. साधारण 2 वर्ष सहन केलेल्या सगळ्याची वेदना. आपल्याच व्यवस्थेकडून झालेल्या अपमान आणि अवहेलनेची चीड. त्या सगळ्यावर मात करत मेहनत करून करून गाठलेलं आजच्या जेतेपदाचं समाधान. जगातील अव्वल क्रमांकावर असलेल्या खेळाडूला हारवल्याचा आनंद. आणि, या व्यवस्थेला, झालेल्या अन्यायाला, भोगलेल्या अवहेलनेला आपल्या कर्तृत्वानी दिलेल्या सडेतोड उत्तराचा आवेश. ही खरी शक्ती. तिच्या चेह-यावर "शक्ती" होती. ते काही क्षण तीच "शक्ती" होती.'



हेमंत ढोमेचीही विनेशसाठी पोस्ट


हेमंतने त्याच्या सोशल मीडियावर विनेशला अपात्र केल्याची पोस्ट शेअर केली आहे. त्यावर त्याने म्हटलं की, absolutely heartbroken, असं म्हटलं आहे. याआधीने त्याने विनेशसाठी पोस्ट करत म्हटलं की, सत्याचा आणि निश्चयाचा कायम विजय होतो! खूप खूप शुभेच्छा विनेश... या देशाला, आम्हा सगळ्यांना आपला अभिमान आहे. आता गोल्ड मेडलच पाहिजे, असं म्हटलं होतं. 


ही बातमी वाचा : 


Vinesh Phogat Disqualified : भारताचं सुवर्णस्वप्न भंगलं, विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर मराठी दिग्दर्शकाची निराशाजनक पोस्ट