Pranali Rathod Fees: प्रणाली राठोड 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेते? जाणून घ्या...
'ये रिश्ता क्या कहलाता है' Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेच्या एका एपिसोडसाठी प्रणाली किती मानधन घेते? याबाबत जाणून घेऊयात...
![Pranali Rathod Fees: प्रणाली राठोड 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेते? जाणून घ्या... yeh rishta kya kehlata hai fame pranali rathod per episode fees Pranali Rathod Fees: प्रणाली राठोड 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेते? जाणून घ्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/19/bcf4a90fec0df0370a0302ee1de767651687165990109259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pranali Rathod Fees: 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध हिंदी मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रणाली राठोड (Pranali Rathod) आणि अभिनेता हर्षद चोपडा (Harshad Chopda) हे प्रमुख भूमिका साकारतात. या शोमधून प्रणाली राठोडला विशेष लोकप्रियता मिळाली. प्रणालीनं 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या एका एपिसोडसाठी प्रणाली किती मानधन घेते? याबाबत जाणून घेऊयात...
प्रणाली किती मानधन घेते?
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील प्रणालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेच्या एका एपिसोडसाठी प्रणाली किती मानधन घेते? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला असेल. प्रणाली ही 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या एका एपिसोडसाठी 55 हजार रुपये मानधन घेते.
View this post on Instagram
प्रणालीनं घेतली आलिशान गाडी
प्रणाली राठोडनं नुकतीच एका आलिशान कार घेतली आहे. या नवीन कारचे फोटो प्रणालीनं सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या फोटोला कमेंट करुन अनेकांनी प्रणालीला शुभेच्छा दिल्या होत्या. प्रणालीने काळ्या रंगाची टाटा हॅरियर खरेदी केली आहे. या SUV ची किंमत 15 ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान आहे, असं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय शोमध्ये हर्षद चोप्रा आणि प्रणाली राठोड यांच्यासोबतच करिश्मा सावंत आणि जय सोनी हे देखील काम करतात. राजन शाही यांचा 'ये रिश्ता क्या कहलाता है' हा शो सोमवार ते रविवार रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येतो.'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. या मालिकेत अनेक ट्वीस्ट येत असतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
अभिनेत्रीचं स्वप्न साकार! 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम प्रणाली राठोडची नवी कोरी गाडी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)