एक्स्प्लोर
'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी
चित्रीकरणावेळी चाहते मोठ्या संख्येने या गावात येतात. परिणामी या ठिकाणी गर्दी होऊन गावकऱ्यांना मनस्ताप होतो, असा दावा केला जात आहे.

कोल्हापूर : प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली 'झी मराठी'वरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेवरुन कोल्हापुरात कल्ला सुरु झाला आहे. कोल्हापुरातल्या ज्या गावात या मालिकेचं चित्रीकरण होतं, त्या गावकऱ्यांनी या मालिकेचं चित्रीकरण थांबवण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात ग्रामंपचायतीकडे निवेदन दिलं आहे. पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही! कोल्हापुरातल्या वसगडे या गावात 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचं चित्रीकरण केलं जातं. चित्रीकरणावेळी चाहते मोठ्या संख्येने या गावात येतात. परिणामी या ठिकाणी गर्दी होऊन गावकऱ्यांना मनस्ताप होतो, असा दावा केला जात आहे. फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय! याशिवाय ज्या वाड्यात मालिकेचं शूटिंग केलं जातं, त्याचे मालक चाहत्यांना तसंच गावकऱ्यांना अर्वाच्य भाषा वापरत असल्याचा आरोपही होत आहे. इंटरनेटवरील पाठकबाईंबद्दलची ही माहिती चुकीची! दरम्यान, शूटिंग सुरु राहावं. कारण यावर शेकडो लोकांचा रोजगार अवलंबून आहे, अशा आशयाचं निवेदन आज कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणार आहे. तसंच महामंडळ आज गावकऱ्यांना भेटून त्यांची समजूतही काढणार असल्याचं कळतं. काढण्यात येणार आहे. फोटो : राणा दा आणि पाठक बाईंच्या लग्नाचा अल्बम
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
विश्व
पुणे























