Tula Shikvin Changlach Dhada : अक्षरा आणि अधिपतीच्या नात्यात पुन्हा दुरावा, राग ठरणार कारण?
Tula Shikvin Changlach Dhada Latest Update : अधिपतीचा राग अक्षरा आणि त्याच्या नात्यात नवीन समस्या निर्माण करेल का? हे पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे.

मुंबई : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changlach Dhada) मालिकेमध्ये आता कुठे अधिपती आणि अक्षराच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरु झाल्याचं पाहायला मिळत होतं, त्यातच आता पुन्हा या दोघांच्या नात्यात दुरावा येण्याची परिस्थिती निर्माण होताना पाहायला मिळणार आहे. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत दुर्गेश्वरी अक्षराला इजा करण्याचा प्रयत्न करते, पण सुदैवाने अक्षरा त्यातून बचावते आणि संपूर्ण प्लान दुर्गेश्वरीवर उलटतो.
अधिपती आणि अक्षराच्या नात्यात नवीन समस्या?
अक्षरा आणि अधिपती हनीमूनवरून कोल्हापुरात परातले आहेत. घरात आल्यावर अधिपतीला भुवनेश्वरीला घरातून हाकलून दिल्याची घटना कळते. अधिपती ते ऐकून अत्यंत चिडतो. हेच कारण की, अधिपती आणि अक्षरा हनिमूनला निघाले असताना चारुहास अक्षराला कॉल करतो आणि तिला सांगतो की, तिने कोणत्याही परिस्थितीत अधिपतीशी भुवनेश्वरीला फोनवर बोलू देऊ नये. तो तिला त्याचा कॉल लॉग डिलीट करण्याची सूचना करतो. चारुहास तिला एवढेच सांगतो की, ते हनिमूनहून परत येईपर्यंत तिने अधिपतीला भुवनेश्वरीशी संपर्क करू नये. ह्या सगळ्या संवादाच्या मागचं सत्य अक्षराला कळतं. अधिपती आणि चारुहास यांच्यात मोठा वाद होतो.
भुवनेश्वरीचा शोध घेण्यासाठी अधिपती घराबाहेर
चारुहासने भुवनेश्वरीला घरातून हाकलून देण्याची योजना आखल्याचा आणि योजनेचा एक भाग म्हणून जाणूनबुजून त्याला आणि अक्षराला त्यांच्या हनीमूनला पाठवल्याचा आरोप अधिपती करतो. अधिपती आणि अक्षरा यांच्यातही मोठा वाद होतो. अधिपती भुवनेश्वरीचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो आणि पोलिस तक्रार ही दाखल करतो. अधिपती भुवनेश्वरीचा शोध घेऊ शकेल का? दुर्गेश्वरीचा कोणता प्लान तिच्यावरच उलटणार? अधिपती-अक्षरा यांच्यामध्ये चारुहासमुळे गैरसमज निर्माण होणार का? यासाठी प्रेक्षकांना 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिका पाहावी लागणार आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :























