![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tula Shikvin Changalach Dhada : नवरा मुलगा पोहोचलाय दारात अक्षरा अडकली संकटात; मास्तरीण बाईंना संकटातून सोडवणार अधिपती...
Tula Shikvin Changalach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेता 1 तासाचा विशेष भाग रंगणार आहे.
![Tula Shikvin Changalach Dhada : नवरा मुलगा पोहोचलाय दारात अक्षरा अडकली संकटात; मास्तरीण बाईंना संकटातून सोडवणार अधिपती... Tula Shikvin Changalach Dhada marathi serial latest update know details Tula Shikvin Changalach Dhada : नवरा मुलगा पोहोचलाय दारात अक्षरा अडकली संकटात; मास्तरीण बाईंना संकटातून सोडवणार अधिपती...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/10/8156349b2a8b1c9f21bc8d3050f85a9b1686389653324254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial Latest Update : मालिका विश्वात (Marathi Serial) सध्या नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. तसेच प्रेक्षकांनाही मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लागली आहे. आता 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changalach Dhada) या मालिकेत नवीन ट्वीस्ट येणार आहे.
मराठी मालिकांचा रंगणार एक तासाचा विशेष भाग
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या लोकप्रिय मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे. ऐन लग्नाच्या दिवशी अधिपती आणि अक्षरा आपापल्या घरातून गायब झाले आहेत. भुवनेश्वरी आणि अक्षराच्या आई वडिलांना जबरदस्त धक्का बसला आहे. तेव्हा अक्षरा आणि अधिपती यांच्यावर काही संकट ओढवणार? की ही असणार बहरणाऱ्या नात्याची नवी चाहूल? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये एकीकडे अक्षराच्या घरच्यांनी तिच्या लग्नाचा घाट घातला आहे. तर दुसरीकडे अक्षरा आणि अधिपती घरातून पळून गेले आहेत. घरातून बाहेर पडल्यानंतर अक्षरा मात्र संकटात सापडली आहे. आता या संकटातून अधिपती मास्तरीण बाईंना सोडवणार आहे.
'तू चाल पुढं' मालिकेत अश्विनीच्या विश्वासाला तडा जाणार
'तू चाल पुढं' या मालिकेत जबरदस्त वळण येणार आहे. 'तू चाल पुढं' या मालिकेत एक तासाच्या विशेष भागात प्रतीक मयुरीला पत्र पाठवतो आणि आपण पळून जायचं आहे असं सांगतो.मयुरी आई वडिलांचा विश्वासघात करून प्रतीकसोबत जायला तयार होईल? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा 11 एप्रिलला रात्री 8 वाजता विशेष भाग रंगणार आहे. तर 'तू चाल पुढं' या मालिकेचा संध्याकाळी 7 वाजता विशेष भाग रंगणार आहे. या विशेष भागांची मालिकाप्रेमींना उत्सुकता आहे. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत हृषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हृषिकेश आणि शिवानीसह कविता लाड-मेढेकर आणि विजय गोखले हे देखील मध्यवर्ती भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या
Tula Shikvin Changalach Dhada : अक्षराचे हात मेहेंदीने रंगणार! अधिपतीच्या प्यारवाली लव्हस्टोरीचा होणार The End?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)