(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tula Shikvin Changalach Dhada : अक्षराचे हात मेहेंदीने रंगणार! अधिपतीच्या प्यारवाली लव्हस्टोरीचा होणार The End?
Tula Shikvin Changalach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत अक्षरा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial Latest Update : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changalach Dhada) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. भुवनेश्वरी, अधिपती आणि अक्षरा ही पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत प्रेक्षकांनी आतापर्यंत पहिले की अक्षरा बरोबर कमलचं लग्न ठरलं आहे. या लग्नाची पत्रिका अक्षराचे बाबा अधिपतीला देतात.
अक्षराचे लग्न ठरले आहे हे पाहून अधिपतीला फारच धक्का बसला आहे. अधिपतीचे अक्षरावर प्रेम आहे ज्याची अक्षराला अजिबात कल्पना नाही. मनातून खचलेला अधिपती स्वतःलाच दोष देत एकांतात एका नदीकाठी बसतो, अधिपतीने दिलेल्या या इमोशनल सीन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे, खूप लोकांनी त्याच्या या कामाचं कौतुक केलं आहे.
अक्षराचे हात मेहेंदीने रंगणार
मी मास्तरीण बाईंसाठी आईसाहेबांकडे भांडलो, ही सगळी शिकलेली माणसे अशीच धोका देतात असे म्हणत, मित्रांजवळ अधिपती आपली व्यथा मांडतो. दुसरीकडे अक्षराकडे लग्नाची धामधूम चालू आहे. अक्षरासह सर्व कुटुंबीय आनंदात आहेत. अक्षराचे हात मेहेंदीने रंगणार आहेत. तेव्हा अक्षरा आणि अधिपतीच्या नात्याला इथेच पूर्णविराम लागणार की वेगळ काही घडणार? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत हृषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हृषिकेश आणि शिवानीसह कविता लाड-मेढेकर आणि विजय गोखले हे देखील मध्यवर्ती भूमिकेत आहेत.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचं कथानक काय?
'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका आहे एका शिक्षिकेची म्हणजेच अक्षराची. जी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि अधिपतीची जो कमी शिकलेला पण गर्भ श्रीमंत आहे. अक्षरा सुंदर, सुशिक्षित, गुणी आणि तत्वनिष्ठ मुलगी आहे तिची शिक्षणाविषयी ठाम भूमिका आहे. तर दुसरीकडे मालिकेचा नायक अधिपतीचे अनेक व्यवसाय आहेत. त्याच्या मालकीची एक शाळादेखील आहे. पण त्याने नववीनंतर शिक्षण सोडलं कारण त्याच्या आईच म्हणणं आहे की शिक्षणाने कुणाचं भलं होत नाही, शिक्षण हे गरिबांसाठी असत त्यामुळे त्यांना नोकरी लागते, अधिपतीसाठी शिक्षण कधीही त्याच्या आड आलं नाही कारण त्याने अनेक व्यवसाय यशस्वीपणे केले आहेत. अधिपतीच आईवर खूप प्रेम आहे, अधिपती अक्षराच्या प्रेमात पडला पण मनातून खुश नसूनही आईने त्या दोंघाच लग्न लावून दिलंय.
तुला शिकवीन चांगलाच धडा
कुठे पाहाल? झी मराठी
किती वाजता? सोम. ते शनि. रात्री आठ वाजता
संबंधित बातम्या