Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत लवकरच एक ट्वीस्ट येणार आहे. यामुळे अरुंधतीचे आयुष्य बदलणार आहे. मालिकेच्या आगामी भागात आशुतोष अरुंधतीसमोर मनातल्या भावना व्यक्त करताना दिसणार आहे. 

Continues below advertisement


26 वर्षात आशुतोष अरुंधतीसमोर मनातल्या भावना व्यक्त न करू शकला नव्हता. पण अखेर तो मनातल्या भावना व्यक्त करणार आहे. हा भाग पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेत नेहमीच ट्विस्ट येत असतो. यामुळे मालिका सोशल मीडियावर चर्चेत असते.





आशुतोषचं अरुंधतीवर असलेलं प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे.आशुतोष आणि अरुंधतीची खूप चांगली मैत्री आहे. पण आता तो अरुंधतीला त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे ते सांगणार आहे. आता अरुंधतीची प्रतिक्रिया काय असेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अरुंधतीने अनिरुद्धपासून घटस्फोट घेतल्यापासून तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण आता अनिरुद्धमुळे तिचे आयुष्य मार्गी लागणार आहे. 


संबंधित बातम्या


Panchayat Season 2 : 'पंचायत'चा नवा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीस; जितेंद्र कुमारनं जाहीर केली तारीख


Bharat Maza Desh Ahe Song : बच्चे कंपनीची धमाल; ‘भारत माझा देश आहे’मधील ‘हुतूतू हूतूतूतू' गाणं प्रदर्शित


Veer Daudale Saat : सरनोबत प्रतापराव गुजर अन् त्यांच्या सहा एकनिष्ठ हिऱ्यांची शौर्यगाथा; 'वीर दौडले सात'चं मोशन पोस्टर रिलीज