Bharat Maza Desh Ahe  Song : भाषा जरी वेगळी असली तरी प्रत्येक शाळेत प्रतिज्ञा ही बोललीच जाते आणि हळूहळू या प्रतिज्ञेशी एक भावनिक नाते निर्माण होऊ लागते, जे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये देशभक्ती निर्माण करते. अशाच देशभक्तीवर आधारित पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘भारत माझा देश आहे’ चित्रपट येत्या 6 मे रोजी प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी  या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता तसेच देशभक्ती जागृत करणारे एक गाणेहीझळकले. या गाण्याला भरपूर पसंती मिळाल्यानंतर आता ‘भारत माझा देश आहे’ (Bharat Maza Desh Ahe ) चित्रपटातील ‘हुतूतू हूतूतूतू’ (Hutu Tu Tu Tu Tu) हे धमाकेदार गाणे घेऊन आले आहे. या गाण्याला अथर्व श्रीनिवासन व विश्व झा जाधव गायले असून समीर सावंत यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला आश्विन श्रीनिवासन यांचे संगीत लाभले आहे. 


‘हुतूतू हूतूतूतू’मध्ये बालकलाकारांची धम्माल पाहायला मिळत आहे. हे गाणे राजविरसिंहराजे गायकवाड, देवांशी सावंत आणि त्यांच्या मित्रांवर चित्रीत करण्यात आले आहे. आपल्या मित्रांसोबत दिवसभर चालणारी मजामस्ती, धमाल, भांडणे  या गाण्यातून दिसत आहे. हे गंमतीदार गाणे बालचमूला आवडणारे आहे. 


चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणतात, “ ‘भारत माझा देश आहे’ देशभक्तीपर असला तरी त्यातून बोध घेण्यासारख्याही अनेक गोष्टी आहेत. या गाण्यातून  लहान मुलांचा निरागसपणाही पाहायला मिळत आहे. अनेकदा लहान मुलांकडूनही शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात. योगायोग म्हणजे हा चित्रपट आम्ही मे महिन्यात प्रदर्शित करत आहोत, ज्या महिन्यात लहान मुलांना सुट्टी असते. त्यामुळे पालक आणि पाल्य दोघेही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील. यापूर्वीची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून या गाण्यालाही भरपूर व्युज मिळत आहेत.'' 



 एबीसी क्रिएशन प्रस्तुत डॉ. आशिष अग्रवाल निर्मित या चित्रपटाची कथा पांडुरंग जाधव यांनीच लिहिली असून या चित्रपटाला समीर सामंत यांचे गीत लाभले आहे तर अश्विन श्रीनिवास यांनी संगीत दिले आहे. निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद असून निलेश गावंड यांनी 'भारत माझा देश आहे'चे संकलन केले आहे. तर नागराज यांनी छायांकनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत शशांक शेंडे, छाया कदम, मंगेश देसाई, हेमांगी कवी, राजविरसिंहराजे गायकवाड, देवांशी सावंत दिसणार आहेत.


संबंधित बातम्या