Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सध्या 'इंडियन आयडल मराठी'च्या महाअंतिम सोहळ्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सुरांच्या मंचावर चंद्रमुखी सिनेमातील 'बाई गं' हे गाणं पहिल्यांदाच सादर करणार आहे. 


कोण जिंकणार मानाची ट्रॉफी? कोण होणार पहिल्या पर्वाचा विनर? असे अनेक प्रश्न रसिकांना पडले आहेत. दरम्यान रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सुरांच्या मंचावर अवतरणार आहे 'चंद्रमुखी' सिनेमातील चंद्रा. चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकर सुरांच्या मंचावर 'चंद्रमुखी' सिनेमातील 'बाई गं' हे गाणं पहिल्यांदाच सादर करणार आहे.





अजय-अतुल यांचं संगीत असलेलं आणि आर्या आंबेकरच्या आवाजात संगीतबद्द झालेलं हे गाणं रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. पहिल्यांदाच हे गाणं रसिकांना सुरांच्या महामंचावर बघायला मिळणार आहे. जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. 


संबंधित बातम्या


Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार'मध्ये राजकीय मेजवानी; कॉंग्रेस, भाजप आणि मनसेचे 'हे' बडे नेते लावणार हजेरी


Jayeshbhai Jordaar Poster : 'जयेशभाई जोरदार'चे पोस्टर रिलीज; रणवीरने विचारलं, जयेशभाईंना मुलगा होणार की मुलगी?


The Delhi Files : 'द दिल्ली फाइल्स' सिनेमात नेमकं काय दाखवणार? विवेक अग्निहोत्रींनी केले स्पष्ट