Kitchen Kallakar :  'किचन कल्लाकार' (Kitchen Kallakar) हा छोट्या पडद्यावरचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या किचनमध्ये चांगलाच कल्ला केला आहे. आता या कार्यक्रमात राजकीय धुरळादेखील पाहायला मिळणार आहे. किचन कल्लाकारच्या आगामी भागात कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) आणि मनसे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) दिसणार आहेत. 


'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात महाराज म्हणजेच प्रशांत दामले नाना पटोले, प्रसाद लाड आणि नितीन सरदेसाई यांना शपथ घ्यायला लावणार आहेत, माझ्यासमोर मी जो पदार्थ बनवतोय त्याच पदार्थाचं मी कौतुक करेन. आजूबाजूला जो पदार्थ बनतोय त्यावर प्रचंड टीका करेन. यावर नाना पटोले म्हणतात,"महाराज तुम्ही भांडणं लावताय.. यानंतर एकच हशा पिकला". 


किचन कल्लाकारच्या मंचावर प्रसाद लाड म्हणाले,"नानांनी हातात घड्याळ बांधून धनुष्यबाण उचललं आहे. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तर प्रसाद लाड यांनी नितीन सरदेसाईंना सल्ला दिला, इंजिनमध्ये आता पेट्रोल टाकायची वेळ आली आहे. आगे आगे देखो होता है क्या... यावर नितीन सरदेसाई म्हणले, आमचं इंजिन आमच्या स्वत:च्या स्पीडने जोरात जाणार आहे". 


'किचन कल्लाकार' या कार्यक्रमामध्ये कालकार आणि नेते मंडळी वेगवेगळे पदार्थ तयार करतात. प्रशांत दामले उत्तम खवय्ये आहेत. त्यामुळे ते 'किचन कल्लाकार'या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत आहेत. पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचन कल्लाकारच्या किचनमध्ये कस लागत असतो. 'किचन कल्लाकार'च्या मंचावर कलाकार पाककलेचे शिवधनुष्य पेलवत असतात. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना मजा येत असते. 


संबंधित बातम्या


Hruta Durgule : मन उडू उडू झालं... हृता दुर्गुळे 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात


Jayeshbhai Jordaar Poster : 'जयेशभाई जोरदार'चे पोस्टर रिलीज; रणवीरने विचारलं, जयेशभाईंना मुलगा होणार की मुलगी?


The Delhi Files : 'द दिल्ली फाइल्स' सिनेमात नेमकं काय दाखवणार? विवेक अग्निहोत्रींनी केले स्पष्ट