The Kapil Sharma Show : छोट्या पडद्यावरचा ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. या शोमधून कॉमेडियन कपिल शर्मा याला घराघरांत प्रसिद्धी मिळाली. त्याच्या या शोला लोकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, काही महिन्यांपूर्वी हा शो ऑफ एअर जात असल्याची घोषणा करण्यात आली होती. ‘द कपिल शर्मा शो’ बंद झाल्याचे कळताच प्रेक्षकही नाराज झाले होते. मात्र, आता हा शो पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेले काही महिने कॅमेरापासून दूर असलेल्या कपिल शर्माने (Kapil Sharma) नुकताच प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.


अभिनेता-कॉमेडियन कपिल शर्माचा नवा लूक पाहून चाहते स्तब्ध झाले आहेत. कपिलने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो ओळखू देखील येत नाहीये. कपिल शर्माचा हा कमाल लूक त्याची पत्नी गिन्नी चतरथ हिनेच डिझाईन केला आहे.


पाहा फोटो :



'द कपिल शर्मा शो' लवकरच छोट्या पडद्यावर परतणार असल्याची घोषणा देखील कपिल शर्माने केली आहे. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर कपिल पुन्हा एकदा त्याच्या संपूर्ण टीमसह सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या नवीन लूकचा फोटो पोस्ट करून त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या फोटोमध्ये कपिलचा लूक पूर्णपणे बदलला आहे. कॉमेडियनचा हा नवा अवतार पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक झाले आहेत.


'द कपिल शर्मा शो'च्या नव्या सीझनमध्ये कपिलची पत्नी गिन्नी चतरथ त्याच्यासाठी स्टायलिस्ट बनली आहे. फोटोत कपिलचा स्वॅग दिसत आहे. या लूकसाठी कपिलने काळ्या जीन्स आणि टी-शर्टवर पांढऱ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला आहे. स्टायलिश गॉगलमध्ये तो खूप स्मार्ट दिसतो आहे. 'द कपिल शर्मा शो'च्या नवीन सीझनमध्ये हा अभिनेता त्याच्या कॉमेडीसोबतच त्याच्या लूकनेही चाहत्यांना घायाळ करणार आहे.   


भारती दिसणार नाही?


‘द कपिल शर्मा शो’च्या नव्या पर्वाची नांदी झाली आहे. सध्या या शोविषयी अनेक चर्चा सुरु आहेत. आता या नव्या पर्वात कोण कोण सहभागी होणार याची माहिती समोर आली आहे. कॉमेडियन भारती सिंह नवीन सीझनमध्ये दिसणार नसल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, सुमोना चक्रवर्ती, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर आणि अर्चना पूरण सिंह यांच्यासह संपूर्ण टीम पुन्हा एकदा शोमध्ये दिसणार आहे. याशिवाय नव्या पर्वात 4 नवीन सदस्यही सामील होणार असल्याचे कळते आहे. भारती तिच्या नव्या प्रोजेक्टमुळे यात दिसणार नसल्याचे बोलले जात आहे.


संबंधित बातम्या :


The Kapil Sharma Show : काय म्हणता, ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा बंद होणार? जाणून घ्या...


Happy Birthday Kapil Sharma :  कॉमन मॅन ते कॉमेडी किंगपर्यंतचा प्रवास खडतर प्रवास! वाचा अभिनेता कपिल शर्माबद्दल...