Kapil Sharma : कॉमेडीयन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच बंद होऊ शकतो. हे ऐकून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, यामागचे कारण दुसरे कोणी नसून खुद्द कपिल शर्माच आहे. नुकताच तो ‘द कश्मीर फाइल्स’च्या टीमला प्रमोशनसाठी शोमध्ये न बोलवल्यामुळे वादात सापडला होता. त्यानंतर त्याचा शो बंद करण्याची जोरदार मागणी झाली. पण, त्याचा हा शो बंद होण्यामागे हे कारण नाही.


खरं तर, कपिलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर करून, आपल्या यूएस-कॅनडा दौऱ्याची घोषणा केली आहे. पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले की, '2022मध्ये माझ्या यूएस-कॅनडा दौऱ्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. लवकरच भेटू.' कपिलचा हा दौरा 11 जूनपासून सुरू होणार असून, 3 जुलैपर्यंत चालणार आहे.



शो बाबत अजूनही संभ्रम!


या पोस्टनंतर सोशल मीडियावर कपिलचा शो लवकरच बंद होणार असल्याच्या चर्चा व्हायरल होऊ लागल्या. कपिलने अशा कोणत्याही बातमीला अधिकृत दुजोरा दिला नसला, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार हा शो लवकरच ऑफ एअर होणार आहे. कपिल शर्मा शोचे निर्माते या शोचे प्रसारण बंद करणार आहेत. दुसरीकडे, कपिल शर्मा देखील त्याच्या कॉमेडी शोमधून थोडा ब्रेक घेईल आणि त्याच्या इतर व्यावसायिक कमिटमेंट्स पूर्ण करून लवकरच परतणार आहे.


पिंकविलाच्या वृत्तानुसार, कपिलने नुकतीच त्याच्या यूएसए आणि कॅनडा टूरची घोषणा केली आहे, जी जूनमध्ये सुरू होईल आणि जुलैच्या सुरुवातीपर्यंत चालेल, त्यामुळे संपूर्ण टीम त्यात व्यस्त असेल. याशिवाय त्याच्याकडे इतरही काही कामाच्या कमिटमेंट्स आहेत आणि हे सर्व हातात असल्याने, त्याला या शोमधून थोडा ब्रेक घ्यायचा आहे. मात्र, काही महिन्यांनंतर नवीन सीझन घेऊन पुन्हा टीव्हीवर परतण्याचा विचार त्याने केला आहे.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha