Kaun Banega Crorepati 14 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडती’चा (Kaun Banega Crorepati) सध्या 14 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिझनचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे करत आहेत. ‘कौन बनेगा करोडती-14’ च्या एपिसोडमध्ये भारतातील वेगवेगळ्या भागामधील स्पर्धक सहभागी होतात. या स्पर्धकांसोबत आमिताभ बच्चन वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतात. नुकत्याच एका एपिसोडमध्ये शोमधील स्पर्धक ऐश्वर्या यांनी मुंबईमधील लोकल प्रवासा दरम्यान घडणारे किस्से सांगितले. 


ऐश्वर्या यांनी सांगितला लोकलमधील अनुभव 


ऐश्वर्या यांनी मुंबईबद्दल त्यांच्या मनात असलेले प्रेम आणि लोकलमधील प्रवास या विषयावर अमिताभ बच्चन यांच्यासोबत गप्पा मारल्या. केबीसीमध्ये ऐश्वर्या यांनी सांगितलं की, कॉलेजमध्ये जाण्यासाठी त्या लोकलमध्ये चार तास प्रवास करत होत्या. त्यांच्या घरापासून कॉलेज हे दूर होते. लोकलमध्ये अनेक वेळा रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत ऐश्वर्या यांची ओळख व्हायची. ते लोक एकमेकांना कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे समजत होते. ऐश्वर्या यांनी पुढे सांगितलं, 'लोकांना कपडे, ज्वेलरी खरेदी करण्यासाठी मॉल किंवा दुकानात जावं लागतं पण मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना हे समान तुम्ही खरेदी करु शकता. तसेच तुम्हाला वेगवेगळे खाद्य पदार्थ देखील लोकलमध्ये मिळतात. वर्षा नावाच्या एक काकू माझ्यासाठी रोज टेस्टी नाश्ता तयार करुन आणत होत्या.' ऐश्वर्या यांचा हा अनुभव ऐकून बिग बी देखील खुश झाले. 


यंदाचा सिझन आहे खास


छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या 14 व्या सिझनची सुरुवात 7 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाली. या सिझनमध्ये खेळाचे काही नियम बदलले आहेत. 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला 75 लाख मिळणार आहेत. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यंदाच्या पर्वात खास 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: