Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होते. त्यातून नुकतेच महाराष्ट्राला टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. 18-19 एप्रिलला 'इंडियन आयडल मराठी'चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. 


कोण गाठणार चुरशीच्या स्पर्धेचं शिखर आणि कोण होणार 'इंडियन आयडल मराठी'च्या पहिल्या सीजनचा विनर? हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे.






जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे.  'इंडियन आयडॉल मराठी'च्या पहिल्या सीजनचे टॉप पाच स्पर्धक कोण असणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. आता या टॉप पाच स्पर्धकांची यादी जाहीर झाली आहे.


संबंधित बातम्या


Alia Ranbir Wedding : कपूर कुटुंबांकडून आलिया भट्टचं स्वागत, करीनासह आदर, रिद्धिमाच्या पोस्ट चर्चेत


KGF 2 : यशच्या 'केजीएफ 2'ची दमदार सुरुवात, पहिल्याच दिवशी 4400 स्क्रीनवर प्रदर्शित


Wedding : आलिया-रणबीरनंतर 'हे' मराठी सेलिब्रिटी अडकणार लग्नबंधनात