Bharti Singh : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली भारती सिंह अनेकदा तिचा यूट्यूब ब्लॉग शेअर करते, ज्याद्वारे ती चाहत्यांना तिच्या दैनंदिन जीवनाची माहिती देत असते. आता तिने त्या खास दिवसाची झलक चाहत्यांना दाखवली आहे, जेव्हा ती तिच्या नवजात बाळाला घेऊन रुग्णालयातून घरी पोहोचली होती.


भारती सिंहने नुकतीच हॉस्पिटलच्या शेवटच्या दिवसाची आणि तिच्या बाळाच्या घरी केलेल्या स्वागताची झलक चाहत्यांना दाखवली आहे. आधी ती हॉस्पिटलच्या रूममधून व्हिडीओ बनवते. त्यात ती सर्व डॉक्टरांचे आभार मानते. यानंतर हर्ष आणि भारती बाळाला घेऊन तिथून निघतात. व्हिडीओमध्ये भारती कारच्या फ्रंट सीटवर बसली आहे, तर तिचा पती हर्ष त्यांच्या मुलासोबत मागे बसलेला दिसला. भारतीने सांगितले की, तिने आणि हर्षने मिळून त्यांच्या मुलाचे नाव 'गोला' ठेवले आहे.



व्हिडीओच्या शेवटी तिने बाळाच्या स्वागतासाठी आपले घर किती सुंदर सजवले होते, ते दाखवले आहे. बाळाच्या स्वागतासाठी भारतीचं घर निळ्या आणि पांढऱ्या फुग्यांनी सजवलेलं होतं. बाळासाठी सर्वत्र तारे आणि फुगे लावण्यात आले होते. भारती आत प्रवेश करताच, तिची आणि तिच्या बाळाची नजर काढली गेली, त्यानंतर ती तिच्या मुलाला आत खोलीत घेऊन गेली. ही खोली देखील  बाळाच्या आगमनासाठी अतिशय गोंडस पद्धतीने सजवली गेली होती.


नुकतेच भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया हे आई-वडील झाले आहेत. त्यांच्या मुलाचा जन्म 3 एप्रिल रोजी झाला. भारती सिंहने सोशल मीडियावर एका खास पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तीच पोस्ट शेअर करत भारती आणि हर्षने लिहिले, 'इट्स अ बॉय'.  भारती तिच्या गरोदरपणाच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शूटिंग करत होती. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


हेही वाचा :