Shivani Virajas Wedding : मराठी मनोरंजनसृष्टीतील चॉकलेट बॉय विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. शिवानी आणि विराजस अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. विराजस-शिवानीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या नात्याविषयी माहिती दिली होती. 


विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे 7 मे 2022 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. पुण्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. चाहत्यांसह संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीचं लक्ष या बहुप्रतिक्षीत लग्नसोहळ्याकडे लागलं आहे. सध्या त्यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली होती. शिवानी आणि विराजस सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ते नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.





विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. 'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून विराजस घराघरांत पोहोचला होता. तर 'बन मस्का' या मालिकेतून शिवानीने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. विराजस हा लेखक आणि दिग्दर्शकदेखील आहे. 


संबंधित बातम्या


Alia Ranbir Wedding : Just Married आलिया-रणबीरची पहिली झलक; 'माझा'च्या कॅमेऱ्यात कैद