Alia Ranbir Wedding : बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टला (Alia Bhatt) ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. आज अखेर दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. आलियाने नुकतेच लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आलिया भट्ट आता कपूर घराण्याची सून झाली आहे. करीना कपूरपासून ते आदर जैनपर्यंत अनेकांनी आलियासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
करीना कपूरने आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा फोटो शेअर करत लिहिले आहे,"डार्लिंग आलिया.. कपूर कुटुंबात तुझं स्वागत. तुम्ही दोघं आयुष्यभर आनंदी रहावे, अशी माझी इच्छा आहे".
रिद्धिमा कपूरने लिहिली खास पोस्ट
रणबीर कपूरची बहीण रिद्धिमानेदेखील आलियाचे खास स्वागत केले आहे. आलिया आणि रणबीरचा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे, आलिया आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू आता एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात केली आहेस. तू कपूर कुटुंबाचाच भाग आहेस.
रणबीर कपूरचा चुलत भाऊ आदर जैन यानेही आलियाचे खास स्वागत केले आहे. आलिया आणि रणबीरचा फोटो शेअर करत, आदरने लिहिले, "कुटुंबात स्वागत आहे".
संबंधित बातम्या