Jui Gadkari: ठरलं तर मग फेम जुई गडकरीनं शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, "पुढचं पाऊल आणि..."
Jui Gadkari: जुईनं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ही सध्या छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग (Tharala Tar Mag) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेमध्ये ती सायली अर्जुन सुभेदार ही भूमिका साकारते. ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता जुईनं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती पुढचं पाऊल या गाण्याचं टायटल साँग गाताना दिसत आहे.
जुई गडकरीनं पुढचं पाऊल या मालिकेचं टायटल साँग गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, "ज्या मालिकेने मला सर्वस्व दिले! पुढचं पाऊल आणि स्टार प्रवाह किती छान कॉम्बो आहे!! आणि आता पुन्हा मी प्रवाहच्या ठरलं तर मग या मालिकेमध्ये काम करत आहे. हे गाणे खासकरून त्या सर्वांसाठी आहे जे मला पुढचं पाऊल मालिकेच्या टायटल ट्रॅकबद्दल मला मेसेज करत होते! त्याचे हे सॅड व्हर्जन आहे. जे नेहा राजपालने गायले आहे."
जुईनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं जुईनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट केली, 'खूप छान आवाज आहे तुझा. तू आणि तुझं कामं मला खूप आवडतं.'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
जुई गडकरीला पुढचं पाऊल या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 2011 ते 2017 च्या दरम्यान पुढचं पाऊल ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत जुईनं कल्याणी सरदेशमुख ही भूमिका साकारली होती. या मालिकेत जुईसोबतच अस्ताद काळे,हर्षदा खानविलकर या कलाकारांनी देखील महत्वाची भूमिका साकारली. या मालिकेतील ,हर्षदा खानविलकरच्या आक्का साहेब या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
'ठरलं तर मग' ची स्टार कास्ट
जुई ही सध्या ठरलं तर मग या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेमध्ये अमित भानुशाली,चैतन्य सरदेशपांडे , ज्योती चांदेकर हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारतात. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: