Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


National Film Award Winner List : 'आट्टम'ला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार, मराठीत 'वाळवी'ची मोहोर; पाहा विजेत्यांची यादी


National Film Award Winner List :   70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली.  आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मल्ल्याळी चित्रपट 'आट्टम'ने आपली छाप सोडली आहे.  आट्टम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याशिवाय मराठी कलाकृतींनी विजेत्यांच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार 'वाळवी'ला देण्यात आला. त्याशिवाय, सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित 'वारसा' या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम कला/सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला.  ज्येष्ठ पत्रकार, सिने अभ्यासक अशोक राणे यांच्या मुंबईतील गिरण्यांवरील माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला  आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.. 


Chhava Teaser : विकी कौशलच्या छावा चित्रपटाचा टीझर व्हायरल, अभिनेत्याचा रुद्रावतार पाहून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला


मुंबई : अभिनेता विकी कौशल त्याच्या आगामी छावा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाच्या टीझरने लक्ष वेधून घेतलं आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंधाना स्टारर छावा चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. स्त्री 2 चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटासोबत छावा चित्रपटाचा ट्रेलर जोडण्यात आला आहे. सोशल मीडियावर छावा चित्रपटाचा हा टीझर व्हिडीओ लीक झाला असून याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.. 


Bigg Boss Marathi : "मी गावठी पॅटर्न, सुटलो तर सुटलो", सूरजच्या पावरचा ट्रेलर पाहून घरातील सदस्यांना फुटला घाम


मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या कॅप्टनसी टास्क सुरु आहे. पहिल्या कॅप्टनचा कार्यकाळ संपल्यानंतर आता दुसरा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांची रस्सीखेंच सुरु आहे. कॅप्टन्सी टाक्समधून टीम B बाहेर पडल्यानंतर आता टीम A मधील सदस्य कॅप्टन्सीचे दावेदार आहेत. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरातील नवीन कॅप्टन होण्यासाठी टीम A मधील सदस्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे खेळ कॅप्टन्सीचा, कल्ला मात्र सूरजचा पाहायला मिळणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.. 


Pushpa 2 : 'पुष्पा 2' चित्रपटातून समंथा रुथ प्रभूचा पत्ता कट, आइटम साँगमध्ये दिसणार 'या' अभिनेत्रीचा जलवा; आकारलं तगडं मानधन


मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पुष्पा 2 : द रुल चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा लागून आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते खूपच आतूर आहेत. पुष्पा चित्रपटातील आयटम साँग खूपच चर्चेत होतं, या गाण्यातील समंथाच्या डान्सने लक्ष वेधून घेतलं होतं. आता पुष्पा 2 चित्रपटातही समंथाचा डान्स पाहायला मिळणार का याची प्रेक्षकांना आतुरता होती. मात्र, पुष्पा चित्रपटातील समंथा रुथ प्रभूचा पत्ता कट झाला आहे. तिच्या ऐवजी दुसरी अभिनेत्री पुष्पा द रुल चित्रपटात आयटम साँग करताना दिसणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.. 


Friends Actor Matthew Perry Death Case : 'फ्रेंड्स' फेम अभिनेता मॅथ्यू पेरीची हत्या झाली? दोन डॉक्टरांसह पाचजण अटकेत


Friends Actor Matthew Perry Death Case :  'फ्रेंड्स' या गाजलेल्या मालिकेतील अभिनेता मॅथ्यू पेरी यांच्या मृत्यूच्या ( Matthew Perry Death Case) एक वर्षानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मॅथ्यूच्या मृत्यू प्रकरणी दोन डॉक्टरांसह पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. यामध्ये मॅथ्यू पेरी यांच्यासोबत राहणारी त्यांची असिस्टंटचाही समावेश आहे.  या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे.  या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.. 


Stree 3 : स्त्री 2 चित्रपटानंतर आता स्त्री 3 ची प्रतीक्षा, चित्रपटाची स्क्रिप्ट तयार; रिलीज डेटबाबत मोठी अपडेट समोर


मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा बहुप्रतिक्षित स्त्री 2 चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री 2 चित्रपटाने प्री-बुकींगापासूनच रेकॉर्ड ब्रेक करण्यास सुरुवात केली आहे. स्त्री 2 चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. स्त्री 2 चित्रपटानंतर आता चाहत्यांना स्त्री 3 चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. असं असताना मेकर्सकडून स्त्री चित्रपटाच्या पुढील भागाबाबत अपडेट समोर आली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.. 


Stree 2 Movie Review : हसवणारा, मनात धडकी भरवणारा अन् खिळवून ठेवणारा; वाचा 'स्त्री-2' चा रिव्ह्यू


Stree 2 Movie Review :  'कंटेट इज किंग' असे म्हटले जाते आणि ही बाब सध्या 'स्त्री-2' (Stree 2) या चित्रपटाला लागू होत आहे. 'स्त्री-2' हा या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.  या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तीरेखा महत्त्वाची असून हे सगळेच नायक आहेत, ही देखील या चित्रपटाची खास बाब आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..