Sumbul Touqeer Dating Rumours : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सुंबुल तौकिर खान नेहमीच कोणत्यानं कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सुंबुल खान बिग बॉस सीझन 16 मध्ये झळकली होती. बिग बॉसमुळे सुंबुलला खरी प्रसिद्धी मिळाली. सुंबुलच्या डेटिंगच्या बातम्या अनेक वेळा समोर येतात, तिचं नाव अनेक वेळा तिच्या सहकलाकारांसोबत जोडलं जातं. आता पुन्हा एकदा सुंबुलच्या डेटिंगची जोरदार चर्चा रंगली आहे.


14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला डेट करतेय सुंबुल तौकीर? 


बिग बॉस (Bigg Boss Season 16) फेम सुंबुल तौकिर खान (Sumbul Touqeer) हिला अनेक वेळा बॉडी शेमिंग आणि ट्रोल्सचा सामना करावा लागतो. यामुळे ती अनेक वेळा चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सुंबुल चर्चेत आली आहे. सुंबुल तिच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यावर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर आता सुंबुलने यावर मौन सोडलं आहे.


सहकलाकाराला डेट करतेय सुंबुल?


अभिनेत्री सुंबुल तौकिर फक्त 20 वर्षांची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचं नाव 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत जोडलं जात आहे. अभिनेत्री सुंबुल तौकिर कोस्टार मिश्कत वर्माला (Mishkat Varma) डेट करत असल्याची अफवा उडत आहेत. यानंतर  तिने आता डेटिंग रुमर्सबाबत मौन सोडलं आहे. 




प्रतिक्रिया देत म्हणाली...


अभिनेत्री सुंबुल तौकीर खानने डेटिंग आणि बॉडी शेमिंगवर आपले मौन तोडले आणि मुलाखतीदरम्यान सांगितलं की, "आता मी काळासोबत मोठी झाली आहे. पूर्वी मला या सर्व गोष्टींची खूप त्रास व्हायचा, पण आता लोक मला काय म्हणतात, माझ्याबद्दल काय विचार करतात, याने मला काही फरक पडत नाही".


"त्यांच्यासारखा मूर्ख दुसरा कुणी नसेल"


सुंबुल पुढे म्हणाली की, "या लोकांची माझ्या आयुष्यात काहीही किंमत नाही. हे लोक मला जेवण देत नाहीत की, माझ्या जागी कामावरही जात नाहीत. या लोकांना माझ्याबद्दल काहीही बोलण्याचा हक्क नाही, त्यानंतरही ते माझ्याबद्दल काही बोलतं असतील, तर त्यांच्यासारखा मूर्ख दुसरा कुणी नसेल".


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : "मी गावठी पॅटर्न, मी सुटलो तर सुटलो", सूरजच्या पावरचा ट्रेलर पाहून घरातील सदस्यांना फुटला घाम