मुंबई : अभिनेता विकी कौशल त्याच्या आगामी छावा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाच्या टीझरने लक्ष वेधून घेतलं आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंधाना स्टारर छावा चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. स्त्री 2 चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटासोबत छावा चित्रपटाचा ट्रेलर जोडण्यात आला आहे. सोशल मीडियावर छावा चित्रपटाचा हा टीझर व्हिडीओ लीक झाला असून याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विकी कौशलच्या छावा चित्रपटाचा टीझर व्हायरल
सोशल मीडियावर छावा चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला असून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर छावा चित्रपटाच्या टीझरची एक क्लिप व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या टीझरमध्ये विकी कौशलचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये युद्धाचा दृश्य दिसत आहे. छावा सैन्याच्या तुकडीवर कशाप्रकारे भारी पडतो, हे यामध्ये दिसत आहे. या टीझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्याचा रुद्रावतार पाहून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला
विकी कौशल स्टाटर छावा चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाच्या शुटींग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत होतं. चाहते या चित्रपटाबाबत प्रत्येक अपडेट जाणून घेण्यास फारच उत्सुक आहेत. त्यातच आता सोशल मीडियावर छावा चित्रपटाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. डिसेंबर 2024 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.
बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडणार
छावा चित्रपटाचा टीझर व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडणार असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. विकी कौशलला छावा भूमिकेत पाहून चाहत्यांना फारच आनंद झाला आहे. हा चित्रपट उत्तम असणार आणि आम्ही नक्की पाहणार, असंही नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं आहे. व्हायरल टीझरनुसार, छावा चित्रपट 6 डिसेंबरला रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे.
पाहा छावा चित्रपटाचा व्हायरल टीझर
श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा स्त्री 2 चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे, या चित्रपटासोबत विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा टीझर आणि वरुण धवनच्या 'बेबी जॉन' चित्रपटाचा टीझर जोडण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात चांगलीच भर पडल्याचं दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :