Bhagya Dile Tu Mala : छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका सुरू आहेत. काही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. उद्यापासून 'असे हे सुंदर आमचे घर' ही मालिका सुरू होणार आहे. तर 'तू तेव्हा तशी' ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. अशातच 'भाग्य दिले तू मला' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. 


'भाग्य दिले तू मला' या मालिकेत अभिनेत्री तन्वी मुंडले (Tanvi Mundle) आणि विवेक सांगळे (Vivek Sangle) मुख्य भूमिकेत असणार आहेत. तन्वी मुंडलेने याआधी 'पाहिले न मी तुला' या मालिकेत काम केले आहे. तर या मालिकेत तिने 'मनू'ची भूमिका साकारली होती. विवेक सांगळेने 'देवयानी','लव्ह लग्न लोचा', 'आम्ही दोघी' मालिकेत काम केले आहे.





'भाग्य दिले तू मला' या मालिकेचे कोणत्या चॅनवर प्रसारण होणार यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तन्वीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिला फोटो पूजेचा आहे. तर दुसऱ्या फोटोत तन्वीसोबत विवेक सांगळे दिसत आहे.  


संबंधित बातम्या


Bachchan Pandey : 'बच्चन पांडे'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात, अक्षय, कृती आणि जॅकलीनचं हटके प्रमोशन


Kangana Ranaut On The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' सिनेमावर 'पंगा क्वीन'ने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...


Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर येणार अभिनेत्री निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha