Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला अल्पावधीतच आपलंस केलं आहे. या कार्यक्रमाचा आगामी भाग खास असणार आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे 'इंडियन आयडॉल मराठी'च्या आगामी भागात दिसणार आहेत. 


'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर 90 च्या दशकातील दोन दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे सुरांच्या मैफिलीचा आस्वाद घेताना दिसणार आहेत. तसेच या अभिनेत्री जुन्या आठवणींनादेखील उजाळा देताना दिसणार आहेत.





'इंडियन आयडॉल मराठी'च्या आगामी भागात विविध प्रकारची सुरेल गाणी स्पर्धक सादर करणार आहेत. इंडियन आयडॉल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतो आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल  असल्याने कार्यक्रमाची रंगत  वाढते आहे. सर्वोत्तम 14 स्पर्धकांमधून महाराष्ट्राला 'इंडियन आयडल मराठी'चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहे.


संबंधित बातम्या


Krrish 4 : भारताचा लाडका सुपरहिरो लवकरच मोठ्या पडद्यावर, हृतिकच्या 'क्रिश 4' सिनेमाची शूटिंग होणार सुरू


Sonu Sood : मी आणि मालविका दोघेही आयुष्यभर तुमच्या सेवेत तत्पर राहू, पराभवानंतर सोनू सूदने केलं ट्वीट


The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन राज्यांत करमुक्त


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha