Taarak Mehta Ka ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) हा शो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. या मालिकेतील अनेक कलाकार हा शो सोडत असल्याने मालिका चर्चेत आली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून अशी चर्चा होती की, या शोमध्ये ‘टप्पू’ची भूमिका साकारणारा अभिनेता राज अंदकत (Raj Anadkat) हा शो सोडणार आहे. मात्र, या चर्चेला अद्याप अभिनेता किंवा निर्मात्यांनी दुजोरा दिलेला नाही. पण, आता राज हा शो सोडत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यातच आता या मालिकेत ‘भिडे मास्तर’ साकारणाऱ्या अभिनेता मंदार चांदवडकर यांनी या विषयी वक्तव्य केले आहे.


अभिनेते मंदार चांदवडकर यांनी नुकतीच पिंकव्हिलाला एक मुलाखत दिली. यावेळी त्यांना राज विषयी देखील विचारण्यात आले. याविषयी बोलताना मंदार म्हणाले की, 'एक कलाकार म्हणून त्याने शो सोडला आहे की, नाही हे आम्हाला माहीत नाही. पण, हो त्याला आरोग्यविषयक काही समस्या आहेत. त्यामुळे तो मागील काही दिवस शूटिंगला येत नाहीये. आम्ही त्याला सेटवर पाहिलेले नाही.’ मंदार यांच्या या वक्तव्यामुळे राजने देखील हा शो सोडला असल्याच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. तर, दुसरीकडे मालिकेत ‘टप्पू’ साकारण्यासाठी नव्या अभिनेत्याची शोधाशोध सुरु झाल्याचेही चर्चा रंगली आहे.


दुबईमध्ये करतोय व्हेकेशन एन्जॉय!


‘टप्पू’ साकारणारा अभिनेता राज सध्या आपल्या आई आणि बहिणीसोबत दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तो सोशल मीडियावर या खास ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. एका व्लॉगमध्ये राजने सांगितले की, तो लवकरच चाहत्यांना एक आनंदाची बातमी देणार आहे. राजने रणवीर सिंहसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, एक मोठा प्रोजेक्ट आहे आणि लवकरच तो त्यासंबंधीची एक चांगली बातमी शेअर करणार आहे.


भव्यनंतर राजची वर्णी!


अभिनेता राज अंदकत 2017पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘टप्पू’ची भूमिका साकारत आहे. या आधी अभिनेता भव्य गांधी या मालिकेत ‘टप्पू’ साकारत होता. त्याने ही मालिका सोडल्यानंतर राज या शोमध्ये सामील झाला. भव्य गांधी अगदी बालपणापासून या शोचा भाग होता. नव्या चित्रपटांमुळे आणि इतर प्रोजेक्टमध्ये काम मिळाल्यामुळे भव्यने हा शो सोडला होता.


हेही वाचा :


Shailesh Lodha : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडल्यानंतर ‘या’ कार्यक्रमात दिसणार शैलेश लोढा, प्रोमो व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला!


TMKOC : ‘अरेच्चा! हे तर मला माहितच नव्हतं!’, शैलेश लोढांच्या शो सोडण्याच्या चर्चेवर ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांची पहिली प्रतिक्रिया