Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावर गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणारी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. गेल्या काही वर्षात या मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम केला होता. आधीच प्रेक्षक जुन्या कलाकारांना मिस करत असतानाच, आता मालिकेतील मुख्य पात्र अर्थात ‘तारक मेहता’ साकारणारे अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) देखील ही मालिका सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेवर आता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumar Modi) यांनी मौन सोडले आहे.


गेल्या आठवडाभरापासून ‘तारक मेहता...’ या मालिकेमध्ये शैलेश लोढा दिसलेले नाहीत. तसेच, ते काही दिवसांपासून सेटवर देखील येत नसल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता ते ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. यावर आता निर्माते असित कुमार मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


ही गोष्ट मला माहितच नाही!


एका प्रसिद्ध वेबसाईटशी बोलताना असित कुमार मोदी म्हणाले की, या सगळ्या अफवा आहेत. शैलेश लोढा किंवा मी यापैकी कुणीही याप्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या बातम्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. शैलेश ही मालिका सोडणार आहे का, याबद्दल मला काहीच माहिती नाही. असे काही असते तर, मला नक्कीच आधीच कळवले गेले असते.


पुढे ते म्हणाले की, गेल्या 14 वर्षांपासून मी एका कुटुंबाप्रमाणे या संपूर्ण टीमला पुढे नेत आहे. माणसे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. पण, हे देखील खरे आहे की, प्रत्येक दिवस सारखा नसतो, कुटुंब आणि तेही इतकं मोठं म्हटल्यावर चढ-उतार येतच राहतात. असित मोदी म्हणाले की, हा शो यात काम करणाऱ्या सर्वांसाठी सारखाच आहे आणि त्याचे नियम व कायदेही सर्वांसाठी सारखेच आहेत. यात काम करणाऱ्या प्रत्येकाला नियमांचे पालन करावे लागेल. कुणीही आपल्या मनाप्रमाणे वागू शकत नाही.


हेही वाचा :


Panchayat Season 2 : प्रेक्षकांसाठी सरप्राईज! ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच रिलीज झाली ‘पंचायत 2’


Cannes Film Festival 2022: लोकल ते ग्लोबल! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे पहिले लोककलाकार ठरले राजस्थानचे मामे खान


Happy Birthday Nawazuddin Siddiqui : कधीकाळी वॉचमनचे काम केले, दारोदारी मसाले विकले! आता बॉलिवूडवर राज्य करतोय नवाजुद्दीन सिद्दीकी!