Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:  छोट्या पडद्यावरील  'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka ooltah chashmah) हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. या कार्यक्रमामधील सर्वच व्यक्तिरेखा या चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या. शोमधील जेठालाल आणि दयाबेन या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. दयाबेनचा भाऊ सुंदरनं देखील प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमधील सुंदर ही भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वकानीने (Mayur Vakani)  इंस्टाग्रामवर नुकतेच काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमध्ये मयूर आणि अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) हे एकाच मंचावर दिसत आहेत.


मयूरनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये तो आणि दिलीप जोशी हे एका कार्यक्रमात नवरात्र उत्सव  साजरा करताना दिसत आहेत. मयूरनं शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये दिलीप जोशी हे गाणं गाताना दिसत आहेत. 






नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स 


मयूरनं शेअर केलेल्या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, दयाबेन कुठंय? तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'माय डियर जीजाजी'






 2008  मध्ये  तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta ka ooltah chashmah) या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये दयाबेन ही भूमिका साकारणारी अभिनेत्री  दिशा वकानीनं (Disha Vakani)   काही वर्षांपूर्वी  हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर  दिशा  ही  शोमध्ये परत येण्याची प्रेक्षक वाट पाहात होते. पण दिशानं अजून शोमध्ये पुनरागमन केलेलं नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Monika Bhadoriya: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका 'दयाबेन'ने का सोडली? शोमधील 'बावरी' म्हणाली...