Bigg Boss 17 Weekend Ka Vaar : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा बहुचर्चित वादग्रस्त कार्यक्रम सुरू झाला असून पहिल्याच 'वीकेंड का वार' (Weekend Ka Vaar) या खास भागात बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौतने (Kangana Ranaut) हजेरी लावली होती. अभिनेत्री तिच्या आगामी 'तेजस' (Tejas) सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस'च्या घरात गेली होती. पंगाक्वीन 'बिग बॉस 17'मध्ये एन्ट्री करताच तिने घरातील सर्व स्पर्धकांना टास्क दिले.


'बिग बॉस'च्या घरातला 'वीकेंड का वार' खूप खास असतो. या सेगमेंटमध्ये घरातील स्पर्धकांची शाळा घेतली जाते. तसेच एखाद्या स्पर्धकाचा 'बिग बॉस'च्या घरातील प्रवास संपतो किंवा नव्या स्पर्धकाची एन्ट्री होत असते. आता 'तेजस' सिनेमाच्या प्रमोशनसाठी कंगनाने 'बिग बॉस 17'मध्ये हजेरी लावली होती. दरम्यान अभिनेत्री पहिल्यांदाच भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) खास डान्सही केला. 






'बिग बॉस 17'च्या मंचावर कंगना रनौतची एन्ट्री!


'बिग बॉस 17'च्या पहिल्या वीकेंड का वारमध्ये कंगना रनौत आणि सलमान खानची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. सलमानने पंगाक्वीनला विचारलं,कोणी सहकलाकाराने तुला फ्लर्ट केलं तर...? यावर उत्तर देत पंगाक्वीन म्हणाली,"तो तुझ्यासारखा हँडसम असेल तर नक्कीच विचार करेन". त्यानंतर सलमान खान कंगनाला फ्लर्ट करत म्हणतो,"तू खूपच सुंदर दिसत आहेस". 


एकाही स्पर्धकाचा प्रवास संपला नाही...


'बिग बॉस 17'मध्ये 17 स्पर्धक सहभागी झाले आहेत. सर्वच स्पर्धकांचा मोठा चाहतावर्ग असून ते त्यांना पाठिंबा देत आहेत. 'बिग बॉस 17'च्या पहिल्या आठवड्यात मनारा चोप्रा, नावेद सोले आणि अभिषेक कुमार या स्पर्धकांपैकी एकाचा प्रवास संपणार होता. पण या आठवड्यात एकाही स्पर्धकाचा प्रवास न संपल्याचं सलमान खानने जाहीर केलं. 'बिग बॉस 17'च्या पहिल्या वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांची शाळा घेतली. 


कंगनाचे आगामी प्रोजेक्ट (Kangana Ranaut Upcoming Project)


कंगनाचा 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तिचे 'तेजस' आणि 'इमरजेंसी' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. तेजस हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहेत. या सिनेमात अभिनेत्री वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 27 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 Contestants Fees : अंकिता लोखंडे ते मुनव्वर फारुकी; 'बिग बॉस 17'साठी स्पर्धकांनी घेतलंय तगडं मानधन