Monika Bhadoriya: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka ooltah chashmah) हा शो गेल्या काही दिवसांपासून वादात भोवऱ्यात अडकला आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये मिसेस सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने या शोच्या निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप केले. हा शो सोडलेल्या इतर कलाकारांनी देखील शोच्या निर्मात्यांवर आरोप केले. 'तारक मेहता'मध्ये बावरी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदौरियानं (Monika Bhadoriya) 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या निर्मात्यांबाबत आणि कलाकारांबाबत नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दयाबेन ही भूमिका दिशा वकानी ही साकारत होती. ही मालिका दिशानं सोडली. याबाबत मोनिकाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, दिशा कादाचित दुखावली गेली असावी. पुढे ती म्हणाली, 'या विषयावर मी भाष्य करू इच्छित नाही. कदाचित तिला कोणत्या तरी गोष्टीचे खूप वाईट वाटले असावे.'
मोनिकाने पुढे मुलाखतीमध्ये सांगितले की, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करत असताना, तिला देखील पेमेंटच्या समस्येचा सामना करावा लागला होता. या कारणामुळे अनेक कलाकारांनी तो शो सोडला होता.
'मला माझ्या कष्टाच्या पैशासाठी वर्षभर झगडावे लागले, तरीही ते पैसे देण्यास तयार नव्हते. मी CINTAA कडे तक्रार करणार असल्याचे त्यांना सांगितल्यावर ते घाबरले आणि त्यानंतर त्यांनी माझे पेमेंट मला दिले. तारक मेहता या मालिकेसोबतच्या माझ्या संपूर्ण सहा वर्षांच्या प्रवासात मला कधीही ठरलेले पेमेंट मिळाले नाही. काय ठरले ते मला आठवत नाही म्हणत या मालिकेचे मेकर्स शब्द मागे घेत होते.' असंही मोनिकानं या मुलाखतीमध्ये सांगितलं.
पुढे मोनिका म्हणाली, 'तारक मेहता या मालिकेचे मेकर्स सर्वांचे पेमेंट अडवून ठेवतात. शैलेश जी, गुरचरण सिंह, राज अनडकट, जेनिफर, नेहा मेहता या सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागला आहे. मी एक वर्ष संघर्ष केला. मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचे पण कधीच मला मदत मिळाली नाही. मी त्यांना नोटीस पाठवल्यावर त्यांनी माझे पेमेंट मंजूर केले.'
28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: